News Flash

‘चमच्याच्या नशिबात खरकटं राहणंच’, नेत्यांच्या मागे फिरणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी जगताप यांचा सल्ला

'चला हवा येऊ द्या' पत्र फेम लेखक अरविंद जगताप यांनी तरुणांच्या सध्य परिस्थितीवर केले भाष्य

अरविंद जगताप

झी मराठी वरील ‘कानाला खडा’ या कार्यक्रमामध्ये या आठवड्याला ‘चला हवा येऊ द्या’ पत्र फेम लेखक अरविंद जगताप सहभागी झाले आहेत. या कार्यक्रमामध्ये जगताप यांनी बड्या राजकीय पक्षांच्या आणि नेत्यांच्या कार्यकर्त्यांसाठी खास संदेश दिला आहे. ‘कार्यकर्ता असण्याचा काळ संपला असून चमचे असण्याचा काळ सुरु झाला आहे’ असं सांगताना कार्यकर्त्यांनी काय करायला हवं याबद्दल जगताप यांनी आपले परखड मत या कार्यक्रमात व्यक्त केले आहे. झी मराठीच्या फेसबुक पेजवर या मुलाखतीमधील जवळजवळ एका मिनिटांचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

या कार्यक्रमात बोलताना जगताप यांनी कार्यकर्त्यांबद्दल वाईट वाटत असल्याचं मत व्यक्त केलं. ‘आज कार्यकर्त्यांची सगळ्यात वाईट अवस्था आहे असं मला वाटतं. कार्यकर्ता असण्याचा काळ संपला असून चमचे असण्याचा काळ सुरु झाला आहे. ताटातला गुलाबजाम तो ओठांपर्यंत नेतोय तर तो गुलाबजाम मला मिळालाय असं या चमच्यांना वाटतयं. हिच या चमच्यांची सगळ्यात मोठी अडचण झालीय. पण त्या चमचाचं काम ते कुणाच्या तरी ओठापर्यंत नेणं हे असतं. चमच्याच्या आयुष्यात फक्त खरकटं होणं हेच असतं. आज चमच्यांची संख्या ऐवढी वाढलीय की (ताटातून ओठापर्यंत नेण्याच्या) एवढ्याश्या प्रवासातच तो समाधानी होतोय. पण त्याला खरकटचं रहावं लागणार आहे आयुष्य. असं असलं तरी दोष त्याच्यावर येणार आहे कारण तो खरकटा दिसणार आहे. खाणारा रुमालाने तोंड पुसून निघून जाणार आहे आणि सध्या हेच होत आहे. आज साध्या नगरसेवक आणि तालुका अध्यक्षाच्या मागे पंधरा पंधरा पोर जय हो करत फिरतात बाईक घेऊन बापाच्या (पैशाने घेतलेल्या) पेट्रोलवर तेव्हा सर्वात जास्त दुर्देव वाटतं की ही तरुणपिढी कुठे चाललीय,’ अशी खंत जगताप यांनी व्यक्त केली आहे.

कार्यकर्त्यांनी नेत्यांकडून आपली काम करुन घेण्यासाठी काय करावं हेही जगताप यांनी सांगितलं आहे. ‘सगळ्यात दुर्देव कार्यकर्त्यांच चमच्यांच हे आहे की तुम्ही मागे फिराल तोपर्यंत तुम्हाला काहीच मिळणार नाही. एक दिवस हा नेता मागे बघेल आणि त्याला दिसेल ना की माझ्या मागे कुणीच नाहीय, एक पण कार्यकर्ता नाहीय त्या दिवशी तो तुमचं काम करायला सुरुवात करेल,’ असे मत जगताप यांनी मांडले.

अरविंद जगताप यांचा सहभाग असलेला ‘कानाला खडा’चा हा भाग शुक्रवारी म्हणजेच २८ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. मात्र अरविंद जगताप यांच्या या व्हिडिओवर अनेकांनी त्यांच्या मताशी सहमत असल्याचं म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2019 10:59 am

Web Title: arvind jagtap said feel bad to see youth being used as karyakartas by political parties scsg 91
Next Stories
1 बिग बींनी शेअर केला मुलीसोबतचा हा खास फोटो
2 सोनाक्षीच्या ‘खानदानी शफाखाना’च्या तारखेत बदल, या दिवशी होणार प्रदर्शित
3 चौथ्या क्रमांकासाठी अभिनेत्री स्पृहा जोशीने सुचवला पर्याय, बघा तुम्हाला पटतोय का?
Just Now!
X