26 November 2020

News Flash

Rajinikanth political entry : राजकारणातील ‘रजनी’पर्वासाठी कलाकारांनी दिल्या शुभेच्छा

बिग बी, कमल हसन आणि इतर कलाकार मंडळींनी रजनीकांत यांना शुभेच्छा दिल्या

रजनीकांत यांचा राजकारणात प्रवेश

यंदाच्या वर्षाचा शेवटचा दिवस हा रजनीकांत यांच्या चाहत्यांसाठी फारच आनंदाचा ठरला आहे. कारण, या सुपरस्टार अभिनेत्याने राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला. रविवारी सकाळी चेन्नईतील श्री राघवेंद्र मंडपम् सभागृहात त्यांनी ही घोषणा करत आपण, एका नव्या प्रवासाला सुरुवात करत असल्याचे स्पष्ट केले. तामिळनाडूतील आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये रजनीकांत नव्या पक्षाकडून २३४ जागा लढवणार आहेत.

कलाविश्वात आपली वेगळीच ओळख प्रस्थापित करणाऱ्या रजनीकांत यांच्या नव्या प्रवासासाठी अनेकांनीच शुभेच्छा दिल्या. यामध्ये कमल हसन, अमिताभ बच्चन, अनुपम खेर यांचाही समावेश आहे. कमल हसन यांनी राजकीय वर्तुळात प्रवेश कणाऱ्या ‘थलैवा’ रजनीकांत यांना शुभेच्छा दिल्यानंतर इतर कलाकार मंडळींनीही यासंबंधीचे ट्विट केले.

‘समंजस व्यक्तिमत्व असणाऱ्या माझ्या अगदी जवळच्या मित्राने राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या भावी वाटचालीसाठी मी मनापासून शुभेच्छा देतो’, असे ट्विट बिग बींनी केले. तर वर्षाच्या शेवटच्या दिवशी मोठ्या दिमाखात राजकीय प्रवेशावर शिक्कामोर्तब करणाऱ्या रजनीकांत यांना ‘जय हो’ असे म्हणत अनुपम खेर यांनी एक ट्विट केले. याव्यतिरिक्तही बऱ्याच सेलिब्रिटींनी या महत्त्वाच्या क्षणाविषयी ट्विट केल्याचे पाहायला मिळाले. त्यापैकीच काही निवडक ट्विट खालीलप्रमाणे…

वाचा : Rajinikanth political entry : ‘फॅन क्लब’च्या माध्यमातून रजनीकांत उभारणार कार्यकर्त्यांची फौज

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 31, 2017 2:07 pm

Web Title: as superstar rajinikanth enters politics bollywood actor amitabh bachchan kamal haasan and other celebrities from film industry sends best wishes
Next Stories
1 ‘बिग बॉस’च्या प्रेक्षकांना धक्का; लव वाचला, प्रियांक शर्मा घरातून बाहेर
2 PHOTOS : बहिणीच्या लग्नात दिसला शाहरुखच्या मुलीचा मोहक अंदाज
3 Rajinikanth political entry : ‘फॅन क्लब’च्या माध्यमातून रजनीकांत उभारणार कार्यकर्त्यांची फौज
Just Now!
X