News Flash

आशा नेगीने सेटवर अपेक्षापेक्षा जोरात अभिनेत्याच्या लगावली कानशिलात

त्यानंतर आशाने माफी देखील मागितली

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री आशा नेगी गेल्या काही दिवसांपासून खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. पण आता ती एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. आशाने एका शोच्या सेटवर चित्रीकरणादरम्यान अभिनेत्याच्या चुकून अपेक्षा पेक्षा जोरात कानशिलात लगावली आहे.

हंगामा प्लेच्या ‘लव का पंगा’ या आगामी ओरिजनल रोमँटिक शोसाठी आशा आणि अभिनेता अंश बागरी एकत्र काम करणार आहेत. या शोमध्ये आशा नेगी एका शहरी आधुनिक तरुणीची भूमिका बजावणार आहे. आधुनिक काळातील प्रेमाची कथा असलेल्या या शोमध्ये अंशने म्हणेजच शोमधील सुमीत या हरयाणवी देसी छोरा साकारला आहे तर आशा दिल्लीतील आधुनिक नेहा या तरुणीची भूमिका साकारली आहे.

मनालीच्या निसर्गरम्य परिसरात चित्रित या कथेत दोन तरुण व्यक्तिरेखा योगायोगाने घडणाऱ्या घटनांमुळे कुणी कल्पनाही करणार नाही, अशा पद्धतीने एकमेकांच्या आयुष्यात येतात. या शोचे चित्रिकरण प्रत्येकासाठीच फार छान अनुभव असला तरी अंश बागरीला एक वेगळाच प्रसंग लक्षात राहिला आहे. चित्रीकरणादरम्यान आशा नेगीने चुकून त्याला अपेक्षेपेक्षा अधिक जोराने मारले होते.

या प्रसंगाबद्दल अंश बागरी म्हणाला, “हो. एक प्रसंग असा आहे ज्यात आम्ही दोघांनीही मद्यपान केले आहे आणि आपापल्या घरी जाताना आमचे पाय लटपटत होते. मात्र, चालताना चुकून तोल जातो आणि सुमीत म्हणजे मी नेहावर पडतो. तेव्हा नेहा मला पटकन कानाखाली मारते. पण, मला वाटतं आशा फारच भूमिकेत शिरली आणि तिने अपेक्षेपेक्षा अधिकच जोराने माझ्या कानाखाली मारली. क्षणभरातच तिच्या लक्षात आलं काय झालं ते आणि आपली चूक झाली हे मान्य करून ती लगेच माफी मागू लागली. खरंतर हा प्रसंग इतका विनोदी होता आणि आताही आम्ही सगळे त्यावर हसतो, हे मला छान वाटतं.” अब्युझ ओरिजनल निर्मित आणि नितेश सिंग दिग्दर्शित ‘लव का पंगा’ हा शो १५ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2020 4:53 pm

Web Title: asha negi slap ansh bagri avb 95
Next Stories
1 भविष्यवाणी ठरली खरी; करोना काळातही ‘या’ चित्रपटानं केली कोट्यवधींची कमाई
2 “इथे वाटीभर पाण्यात डुंबणाऱ्यांना नैसर्गिक मृत्यू येतो”; पायल घोषने उडवली बॉलिवूडची खिल्ली
3 “अवॉर्ड शो फक्त पैसे कमावण्यासाठी असतात”, सैफ अली खानचे वक्तव्य
Just Now!
X