News Flash

‘या’ विवाहीत व्यक्तीच्या प्रेमात होत्या आशा पारेख

एका कार्यक्रमात आशा पारेख यांनी हा खुलासा केला आहे

‘मेरा गाव मेरा देश’, ‘कटी पतंग’, ‘तीसरी मजिल’ या चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे आशा पारेख. एकेकाळी त्यांनी त्यांच्या सौंदर्याने अनेकांना घायाळ केले होते. तसेच त्यावेळी त्यांनी अभिनयाच्या जोरावर स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांनी १९५९ पासून ते १९७३ पर्यंतच्या काळात बॉलिवूडवर जादूच केली होती. त्यावेळी आशा पारेख यांचे सर्वजण दिवाने होते. मात्र स्वत: आशा देखील कोणाच्या तरी प्रेमात होत्या. पण त्यांनी लग्न केले नाही.

आशा पारेख यांना एका पुस्तक लॉन्च दरम्यान त्यांच्या लव्ह लाईफबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी आयुष्यात एका व्यक्तीची एण्ट्री झाली असल्याचे सांगितले. मात्र ही व्यक्ती त्यांच्या आयुष्यातील पहिली आणि शेवटची व्यक्ती होती. दुर्दैवाने त्यांचे त्या व्यक्तीशी लग्न होऊ शकले नाही. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेता आमिर खानचे काका आणि दिग्दज दिग्दर्शक- निर्माते नासिर हुसैन असल्याचा खुलासा आशा पारेख यांनी केला. आशा यांचे नासिर यांच्यावर प्रेम होते. परंतु नासिर त्यावेळी विवाहित होते. नासिर यांनी त्यांचा संसार सोडून आपल्याशी लग्न करावे हे आशा यांना कदापी मान्य नव्हते. म्हणून आशा यांनी नासिर यांच्याशी लग्न केले नाही.

 

View this post on Instagram

 

Reposted from @verveindia (@get_regrann) – Being the highest-paid and most successful actor of her time, ’60s superstar #AshaParekh had suitors line up by the dozens to ask for her hand in marriage. But the 77-year-old superstar rejected all of them in favour of a solitary existence. Why was that? Did no man ever match up to her standards? Did her reputation and beauty intimidate prospective partners? Parekh reveals that staying alone was probably one of the best decisions she ever made, adding that ‘love’, as she knows it, is very different from what the word means today. “People mistake the thrill of early love for a relationship that is capable of braving storms and get disillusioned when they find out that their partner isn’t perfect. Polygamy is becoming quite commonplace today and for someone like me who believes that love is eternal and all-encompassing, it is quite shocking. Maybe we are evolving as a species or maybe we’ve just forgotten how to love.” Full story at the link in bio. Words by: @sadaf_shaikh Styled by: @shwetanav Photographed by: @sushantchhabria Hair by: Perpetual Rodrigues Make-up by: @tulsi5solanki __ #UntyingTheKnot #CelebrateYou #NewIssue – #regrann

A post shared by asha parekh (@ashaparekh_ji) on

‘नासिर हे माझ्या आयुष्यात येणारे पहिले आणि शेवटचे व्यक्ती होती. माझे त्यांच्यावर खूप प्रेम होते. माझ्या आयुष्यात जी महत्त्वाची माणसे आहेत त्यांच्याबद्दल मी ऑटोबायोग्राफी लिहिली नाही तर माझा काय उपयोग’ असे त्या आयएएनएस दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणाल्या.

‘मी एकटी राहण्याचा घेतलेला निर्णय आत्ता पर्यंत घेतलेल्या निर्णयांपैकी एक योग्य निर्णय होता. मी एका विवाहित व्यक्तीच्या प्रेमात होते आणि मला त्यांच्या संसारामध्ये अडथळा बनायचे नव्हते. एकटे राहणे हा माझा निर्णय होता आणि त्याप्रमाणे मी राहते’ असे पुढे त्या म्हणाल्या

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2019 1:30 pm

Web Title: asha parekh says she was in love with this bollywood director avb 95
Next Stories
1 जाणून घ्या कियाराच्या कपड्यांची किंमत, ऐकून व्हाल थक्क!
2 ‘जनतेला आपलं पानिपत झाल्यासारखं वाटलं’; ‘चला हवा येऊ द्या’मध्ये गाजलं महाराष्ट्राचं राजकारण
3 रजनीकांतने चक्क चाहत्याचे धरले पाय, कारण…
Just Now!
X