२३ सप्टेंबर १९८८ रोजी मराठी चित्रपटसृष्टीत एका सोनेरी पानाचा उगम झाला. याच दिवशी राज्यात सर्वत्र ‘अशी ही बनवाबनवी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. याला आज तब्बल ३२ वर्ष पूर्ण झाली. एवढी वर्ष उलटली तरी या चित्रपटाची जादू आजही कमी झालेली दिसत नाही. दरम्यान या चित्रपटावर अभिनेता सिद्धार्थ जाधव याने कौतुकाचा वर्षाव केला आहे. असा चित्रपट पुन्हा होणे नाही असं म्हणत त्याने आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

अवश्य पाहा – पतीला घटस्फोट देऊन ही अभिनेत्री राहतेय बॉबी देओलच्या घरात

“आजच्या दिवशी २३ सप्टें. १९८८ ला अशी ही बनवाबनवी चित्रपट प्रदर्शित झाला होता. एखादा सिनेमा मनात घर करतो त्यातले सिन आजही आठवून आठवून आपल्याला आनंद देतात यापेक्षा मोठं यश ते काय! हा सिनेमा बनविणाऱ्या सर्व कलाकार, तंत्रज्ञ साऱ्यांचे आभार आणि शुभेच्छा!” अशा शब्दात त्याने या ‘अशी ही बनवाबनवी’ चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

अवश्य पाहा – “इंटिमेट सीन शूट करण्यापूर्वी अनुरागने मला खोलीत बोलावलं”, अन्…; अभिनेत्रीचा खुलासा

‘लोकप्रियतेबद्दल विश्वास होता’ – सचिन पिळगावकर, अभिनेता-दिग्दर्शक

“आपण कुठल्याही गोष्टीला आकार देत असतो त्यावेळी आपल्याला ती गोष्ट कशी होईल याची एक कल्पना त्याच्या शेवटाला येत असते. ‘अशी ही बनवाबनवी’ चित्रपट बनवतांनाच्या अनेक आठवणी आहेत. त्यात मी चित्रपटाच्या शेवटच्या टप्प्याचे चित्रीकरण सुरू असताना निर्माते किरण शांताराम यांना म्हणालो होतो की मला ते रजत महोत्सव पूर्ण झाल्यानंतर सन्मानचिन्ह देतात ते बनवणाऱ्या कलाकारांना भेटायचं आहे. त्यावेळी मी त्यांना भेटून सन्मानचिन्ह बनवून घेतलं. त्यावेळी मला त्या कलाकारांनी वेडय़ात काढलं असेलही पण तो माझा आत्मविश्वास होता. जसा जसा चित्रपट पूर्ण होत होता तसतसं मला चित्रपट लोकप्रियतेचा शिखर गाठेल हा विश्वास मनात पक्का होत होता. आज तीस वर्षांनंतरही हा चित्रपट लोकांच्या पसंतीस उतरतो आहे.”