01 June 2020

News Flash

“सलमान खान माझा जीव वाचव”; आजारी अभिनेत्याने केली मदतीची याचना

“हॉस्पिटलचं बिल भरून मी कंगाल झालोय”; आजारी अभिनेत्याला मदतीची गरज

‘सुसराल सिमर का’ या टीव्ही मालिकेतून लोकप्रिय झालेले अभिनेता आशीष रॉय सध्या आजारी आहेत. गोरेगाव येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. परंतु त्यांच्याकडे आता रुग्णालयाचे बिल भरण्यासाठी सुद्धा पैसे उरलेले नाहीत. परिणामी त्यांनी अभिनेता सलमान खानकडे मदतीची याचना केली आहे.

अवश्य पाहा – अमेय वाघने केलाय ZLB चा कोर्स; फुकट प्रशिक्षण घेण्यासाठी पाहा व्हिडीओ

अशिष यांना उपचारासाठी ICUमध्ये ठेवण्यात आलं आहे. स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपल्या बिकट आर्थिक परिस्थितीवर भाष्य केलं. ते म्हणाले, “दोन दिवसांचं बिल जवळपास दोन लाख रुपये झालं आहे. ते पैसे मी भरले परंतु आता अधिक काळ मी रुग्णालयात उपचार घेउ शकणार नाही. कारण माझ्याकडे आता एक पैसाही उरलेला नाही. मी पार कंगाल झालो आहे. आता मला केवळ सलमान खानकडूनच मदतीची अपेक्षा आहे. मला खात्री आहे की माझी अवस्था पाहून तो मला नक्की मदत करेल.”

अवश्य पाहा – इतकी भीती! कसलं जीवन जगत आहात; पाकिस्तान विमान अपघातावरून अभिनेत्याचा बॉलिवूडला सवाल

आशीष रॉय हे एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेता आहेत. त्यांनी आजवर ‘ससुराल सिमर का’, ‘बनेगी अपनी बात’, ‘ब्योमकेश बाक्क्षी’, ‘यस बॉस’, ‘बा बहू और बेबी’, ‘मेरे अंगने में’, ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ आणि ‘आरंभ’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. तसंच ते व्हॉइस ओव्हर आर्टिस्टही आहेत. त्यांनी ‘सुपरमॅन रिटर्न्स, ‘द डार्क नाइट’, ‘गार्जियन्स ऑफ द गॅलेक्सी’, ‘द लेजेंड ऑफ टार्झन’ आणि ‘जोकर’ या हॉलिवूडपटांसाठी डबिंगही केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2020 4:13 pm

Web Title: ashiesh roy seeks help from salman khan to pay hospital bills mppg 94
Next Stories
1 घरकामातही अमेय आहे वाघ; देतोय झाडू, लादी आणि भांडी घासण्याचं प्रशिक्षण
2 “ही घटना पाहून धैर्य संपलं”; पाकिस्तान विमान अपघातामुळे अभिनेत्री भावूक
3 निधनाच्या अफवांवर मुमताज यांचं स्पष्टीकरण; व्हिडिओ पोस्ट करत म्हणाल्या..
Just Now!
X