लोकप्रिय अभिनेता आशिष शर्माने ‘लव्ह, सेक्स और धोका’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. आता आशिष ‘हिंदुत्व’ आणि ‘हुश’ या त्याच्या दोन आगामी चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या दरम्यान, एका मुलाखतीत आशिषने घरानेशाहीवर वक्तव्य केलं आहे.

‘स्पॉटबॉय’ने दिलेल्या वृत्तानुसार, “तुझ्या अभिनयाला प्रेक्षकांनी पसंती दिली आहे. तर इंडस्ट्रीमध्ये राहण्यासाठी एवढं पुरेस आहे का?” असा प्रश्न आशिषला विचारण्यात आला. “प्रतिभा असणे महत्त्वाचं आहे, त्या शिवाय आपण या इंडस्ट्रीमध्ये राहू शकत नाही. आपण कोण आहोत आणि कुठून आलो याचा काही फरक पडतं नाही. पण  इथे राहण्यासाठी फक्त ती एकच गोष्ट नाही, आपल्यासारखे अनेक प्रतिभावान लोक आहेत ज्यांना काम मिळतं नाही आहे. मला टेलिव्हिजनच्या माध्यमातून ओळख मिळाली यासाठी मी स्वत:ला भाग्यवान मानत असून मी आभारी आहे. मला संधी मिळाली जिथे मी माझी प्रतिभा दाखवू शकलो. परंतु, चित्रपटांमध्ये एका बाहेरच्या व्यक्तीला स्वत: ची जागा निर्माण करणे खूप कठीण आहे,” असं आशिष म्हणाला.

यानंतर इंडस्ट्रीत कोणत्या प्रकारच्या अडथळ्यांना तोंड द्यावे लागेल यावर आशिषने मत मांडले. आशिष म्हणाला, “तिथे घराणेशाही ही स्पष्टपणे आहे आणि आपण त्या वस्तुस्थितीपासून पळून जाऊ शकत नाही. त्यामुळेच आपल्याकडे तिथे येण्यासाठी जागा नाही. स्टारकिड्सची पहिली पायरी ही सोपी आहे आणि आपल्याला त्या पहिल्या पायरी पर्यंत पोहोचायला अनेक वर्ष लागतात. त्यात छोट्या पडद्यावरील कलाकार म्हणून आमची आणखी लढाई असते, ती म्हणजे आम्हाला ‘टीव्ही कलाकार’ असे लेबल दिले जाते.”

आशिषने छोट्या पडद्यावर अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. सोबतच त्याने ‘खेजडी’ या चित्रपटात भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्याची भूमिका ही चित्रपट समिक्षक आणि प्रेक्षकांन देखील प्रचंड आवडली होती. आशिष लवकरच ‘मोदी : जर्नी ऑफ कॉमन मॅन’ या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. ही वेब सीरिज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारीत ही.