01 April 2020

News Flash

ऐकलंत का? सई ताम्हणकरच आहे सविता भाभी!

सविता भाभी... तू इथंच थांब!! असे होर्डिंग पुण्यात पाहायला मिळाले होते.

सविता भाभी… तू इथंच थांब!! असे होर्डिंग पुण्यात पाहायला मिळाले होते. हे होर्डिंग कोणी लावले, का लावले, त्याचा नेमका अर्थ काय असे अनेक प्रश्न तेथून येणाऱ्या-जाणाऱ्यांना पडले होते. आता या होर्डिंगमागचं गुपित उलगडलं आहे. ही सविता भाभी दुसरी तिसरी कोणी नसून चक्क मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर आहे. तिच्या आगामी ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ या चित्रपटात ती सविता भाभी हे पात्र साकारतेय. या पात्रामागेही बरंच गुपित आहे. पण ते आता चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच प्रेक्षकांना समजू शकेल. तुर्तास या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे आणि सविता भाभी या रहस्यावरून पडदा उठला आहे.

‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ या नावावरूनच बरेच तर्कवितर्क लढवले गेले आहेत. मात्र चित्रपटाची कथा नेमकी काय आहे याची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. अभय महाजन, पर्ण पेठे आणि सई ताम्हणकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. त्याचसोबत सायली पाठक, अक्षय टांकसाळे, ऋतुराज शिंदे, केतन विसाळ, विराट मडके, अमेय वाघ हे चेहरेही या चित्रपटात दिसणार आहेत. आलोक राजवाडे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.

जवळपास अडीच मिनिटाच्या या ट्रेलरमध्ये सुरुवातीला सविता भाभी या पात्राची ओळख करून दिली आहे आणि ट्रेलरच्या सुरुवातीला त्या पात्रावरून पडदा उठतो. या ट्रेलरने कथेविषयीची उत्सुकता निर्माण केली असून येत्या ६ मार्च रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2020 12:33 pm

Web Title: ashleel udyog mitra mandal trailer sai tamhankar abhay mahajan parna pethe ssv 92
Next Stories
1 ‘तेजस’मध्ये कंगना; होणार एअर फोर्स पायलट
2 सरसंघचालकांचं वक्तव्य हास्यास्पद – सोनम कपूर
3 तारा सुतारीया या अभिनेत्याला करतेय डेट?
Just Now!
X