बदलत्या काळानुसार प्रत्येक क्षेत्रात लहान-मोठे बदल हे होतच असतात.त्यामुळे या बदलत्या काळाचा पडसाद कलाविश्वावरही पडला आहे. चित्रपटांच्या कथानकात, सादर करण्याच्या पद्धतीत अनेक बदल झाले आहेत. हेच बदल हळूहळू संगीत क्षेत्रातही झाल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळेच पुर्वीच्या काळी आणि सध्याच्या काळात संगीत क्षेत्रात नेमके कोणते बदल झाले हे संगीतकार अशोक पत्की यांनी सांगितलं आहे.


दरम्यान, लोकसत्ता ‘सहज बोलता बोलता’ या कार्यक्रमात त्यांनी विविध विषयांवर त्यांचं मत मांडलं. तसंच संगीत क्षेत्रातील त्यांचा नेमका प्रवास कसा सुरु झाला हेदेखील सांगितलं.