News Flash

अग्गंबाई सासूबाईमधील सोहम आहे ‘या’ दिग्गज कलाकाराचा मुलगा

ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीत उतरत आहे

मालिका आणि प्रेक्षक यांचं एक अतुट नातं असतं. काही मालिका या अशा असतात की ज्या वर्षानुवर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. ‘वादळवाट’, ‘आभाळमाया’,’उंच माझा झोका’ आणि अलिकडेच प्रेक्षकांचा निरोप घेतलेल्या ‘लागीरं झालं जी’ या मालिकांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्यातच आता आणखी एक मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करु पाहत आहे. झी मराठीवर नव्यानेच सुरु झालेली ‘अग्गंबाई सासूबाई’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीत उतरत आहे. या मालिकेतील बरेचसे चेहरे प्रेक्षकांच्या ओळखीचे आहेत. मात्र यात ‘सोहम’ ही व्यक्तीरेखा साकारणारा नवखा कलाकार प्रेक्षकांच्या कुतूहलाचा विषय ठरत आहे.

काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेमध्ये गिरीश ओक, निवेदिता सराफ, रवी पटवर्धन, तेजश्री प्रधान आणि आशुतोष पत्की हे कलाकार मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहेत. यात तेजश्रीने शुभ्रा ही भूमिका साकारली आहे. तर आशुतोष बाबड्या उर्फ “सोहम” ही व्यक्तिरेखा साकारत आहे.

आशुतोष हा ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचा मुलगा आहे. विशेष म्हणजे या मालिकेव्यतिरिक्त तो आगामी ‘वन्स मोअर’ या चित्रपटातही झळकणार आहे. ‘अग्गंबाई सासूबाई’च्या माध्यमातून छोट्या पडद्यावर झळकणाऱ्या या कलाकाराचा कमी कालावधीमध्ये चांगलाच फॅन फॉलोअर निर्माण झाला आहे.

दरम्यान, बारावीनंतर हॉटेल मॅनेजमेंट करणाऱ्या आशुतोषचं अभिनय हे पॅशन आहे. त्यामुळे तो थेट अभिनयाकडे वळला आहे. अशुतोषने अनुपम खेर अॅकॅडमीमध्ये अभिनयाचं प्रशिक्षण घेतल असून यापूर्वी तो ‘मेंदीच्या पानावर’ आणि ‘दुर्वा’ या गाजलेल्या मालिकांच्या माध्यमातून घराघरात पोहोचला आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2019 3:00 pm

Web Title: ashok patkis son ashutosh patki aggabai sasubai marathi serial ssj 93
Next Stories
1 गुड न्यूज! सलमानच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन?
2 अक्षय कुमारचा ‘बच्चन पांडे’मधील हटके लूक पाहिलात का?
3 रोहित शर्माने अनफॉलो केल्यानंतर अनुष्काने लिहिली ‘ही’ पोस्ट
Just Now!
X