News Flash

लग्नसोहळ्यासाठी अॅस्टन कचर आणि मिला कुनीस भारतीय पेहरावात

हॉलिवूडमधील अॅस्टन कचर आणि मिला कुनीस या प्रसिद्ध जोडप्याने इटली येथे नुकत्याच झालेल्या एका लग्नसोहळ्यात चक्क पारंपरिक भारतीय पोशाखात हजेरी लावली होती.

| July 7, 2014 11:11 am

हॉलिवूडमधील अॅस्टन कचर आणि मिला कुनीस या प्रसिद्ध जोडप्याने इटली येथे नुकत्याच झालेल्या एका लग्नसोहळ्यात चक्क पारंपरिक भारतीय पोशाखात हजेरी लावली होती. अॅस्टन कचर आणि त्याची वाग्दत्त वधू मिला यांनी त्यांच्या मित्राच्या लग्नासाठी खास भारतीय पद्धतीचे पोशाख परिधान केले होते. निळ्या रंगाचा नक्षीकाम केलेला कुर्ता आणि डोक्यावर लाल रंगाचा फेटा घातलेल्या अॅस्टनने अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला. तर दुसरीकडे मिला कुनीसनेसुद्धा भारतीय पद्धतीचा मिंट गाऊन परिधान केला होता. यावेळी प्रवेशद्वारावर भारतीय वेषात पाहुण्यांच्या स्वागतासाठी उभ्या असणाऱ्या अॅस्टन कचरने खास बॉलीवूड स्टाईलचे नृत्य करत उपस्थितांचे मनोरंजनही केले.    

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2014 11:11 am

Web Title: ashton kutcher mila kunis wear indian attire at friends wedding
Next Stories
1 शाहरुख-सलमानचे पुन्हा मनोमिलन!
2 “सॅटर्डे  संडे” ची पहिली झलक अनुराग कश्यपच्या हस्ते 
3 रोहित शेट्टीसोबत काम करण्याची आलियाची इच्छा
Just Now!
X