27 November 2020

News Flash

आम्ही दोघांनीही एकमेकांना फसवलं, जगप्रसिद्ध शेफच्या आत्महत्येनंतर प्रेयसीची कबुली

अँथनी यांच्या मृत्यूसाठी लोक मला जबाबदार धरत आहेत, पण त्यानं आत्महत्या का केली हे मलाही जाणून घ्यायचं आहे.

आत्महत्येसाठी अनेकांनी त्यांची प्रेयसी आणि इटालियन अभिनेत्री एशिया आर्गेंटो हिला जबाबदार धरलं आहे.

जगप्रसिद्ध अमेरिकन सेलिब्रिटी शेफ अँथनी बॉर्डेन यांनी जून महिन्यात आत्महत्या केली. फ्रान्समध्ये एका शोच्या चित्रिकरणादरम्यान त्यांनी गळफास लावून आत्महत्या केल्यानं एकच खळबळ उडाली. मात्र त्यांच्या आत्महत्येसाठी अनेकांनी त्यांची प्रेयसी आणि इटालियन अभिनेत्री एशिया आर्गेंटो हिला जबाबदार धरलं आहे. त्यांच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच त्यांची प्रेयसी समोर आली आहे. ‘अँथनी यांच्या मृत्यूसाठी लोक मला जबाबदार धरत आहेत. मी त्याला फसवलं असं अनेकांचं म्हणणं आहे मात्र त्यानंही मला फसवलंच होतं आणि यातून ते आत्महत्या करतील असं मला वाटत नाही ‘ असं स्पष्टीकरण तिनं दिलं आहे.

जून महिन्यात फ्रान्समध्ये ‘पार्ट अननोन’ या ट्रॅव्हल अँड फूड शोसाठी ते एपिसोड चित्रीत करत होते. ‘पार्ट अननोन’ हा त्यांचा ट्रॅव्हल शो गेल्या पाच वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत होता. मात्र याचवेळी त्यांनी राहत्या हॉटेलमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. बॉर्डेन यांनी आत्महत्या करण्यापूर्वी ४१ वर्षीय एशिया हिचे मित्रासोबत रोमध्ये फिरतानाचे काही फोटो व्हायरल झाले होते त्यामुळे याच कारणामुळे बॉर्डेन यांनी आत्महत्या केली असावी असं म्हटलं जात आहे. बॉर्डेन यांच्या आत्महत्येसाठी त्यानंतर अनेकांनी प्रेयसी एशिया हिलाच जबाबदार धरलं आहे.  या आरोपामुळे दुखावलेल्या एशियानं पहिल्यांदाच एका मुलाखतीतून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.

केवळ मीच अँथनीला फसवलं असलं नाहीये त्यानंही मला फसवलं होतं असंही एशिया मुलाखतीत म्हणाली. अद्यापही अँथनीच्या मृत्यूचं कारण समोर आलं नाहीये मात्र त्यानं आत्महत्या का केली हे मलाही जाणून घ्यायचं आहे असंही ती म्हणाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2018 12:20 pm

Web Title: asia argento on celebrity chef boyfriend anthony bourdain suicide
Next Stories
1 नाना पाटेकरांनी केलं गैरवर्तन, अभिनेत्री तनुश्री दत्ताचा खळबळजनक आरोप
2 TOP 10: देव आनंद यांचे १० अविस्मरणीय सिनेमे…
3 ‘जॅक स्पॅरो हे पात्र भगवान श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित’
Just Now!
X