News Flash

हक्काचं घर! असिम रियाजनं मुंबईत घेतला फ्लॅट

पाहा, असिम रियाजचं घर

बिग बॉस १३ या रिअॅलिटी शोमधील सर्वाधिक चर्चेत राहिलेला स्पर्धक म्हणजे असिम रियाज. ‘बिग बॉस १३’चं पर्व संपल्यानंतरही असिमची लोकप्रियता कायम आहे.त्यामुळे त्याच्याविषयी जाणून घेण्यास चाहते कायमच उत्सुक असतात. अलिकडेच असिमने मुंबईत स्वत:च्या हक्काचं घर घेतलं असून त्याच्या या घराची चर्चा सध्या चाहत्यांमध्ये रंगली आहे.

असिमने सी फेसिंग असलेलं घर घेतलं असून याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअरदेखील केले आहेत. असिमने इन्स्टा स्टोरीमध्ये त्याच्या घराचे फोटो शेअर केले होते. तसंच असिमच्या चाहत्यांनी त्याच्या घराचे फोटो आणि व्हिडीओदेखील फॅनपेजवर शेअर केले आहेत.

“जेव्हा आपली मुलं मेहनत आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर यश संपादन करतात त्यावेळी वडिलांच्या डोळ्यातला आनंद त्यांना लपवता येत नाही. आज हा व्हिडीओ पाहून मला खरंच फार आनंद होत आहे. असिमच्या घरातून समुद्र किनारा दिसत आहे”, अशा भावना असिमच्या वडिलांनी व्यक्त केल्या.

असिम रियाज हा ‘बिग बॉस १३’मध्ये अंतिम फेरीपर्यंत पोहोचला होता. शेवटच्या फायनलिस्टमध्ये त्याचा सहभाग होता. मात्र, ‘बिग बॉस १३’ चा किताब सिद्धार्थ शुक्लाने पटकावला. विशेष म्हणजे ‘बिग बॉस’नंतरही असिमची लोकप्रिय कायम आहे. त्याने हिमांशी खुराना आणि जॅकलीन फर्नांडिससोबत म्युझिक अल्बममध्येही काम केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 13, 2020 11:53 am

Web Title: asim riaz bought sea facing house in mumbai father feels proud ssj 93
Next Stories
1 नेहा कक्करनंतर आदित्य नारायण अडकणार लग्न बंधनात
2 ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत होणार ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीची एण्ट्री
3 सलमानने लग्नाविषयी केला खुलासा; “माझं लग्न झालं आहे, पण…”
Just Now!
X