छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणजे ‘बिग बॉस.’ बिग बॉसचे हे १४वे पर्व सुरू आहे. बिग बॉसचे यंदाचे पर्व हे बिग बॉसच्या इतिहासातील सर्वात जास्त काळ सुरू असलेले पर्व ठरले आहे. बिग बॉसच्या घरात अनेक सिनियर्सची एण्ट्री झाली. आता आणखी एक सिनियर बिग बॉसच्या घरात एण्ट्री करणार अशा चर्चा रंगल्या आहेत. हा स्पर्धक दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता असीम रियाझ आहे.

असीमला विकेंडचा वॉर एपिसोडसाठी बोलावण्यात आले होते. मात्र बॉलिवूडचा भाईजान सलमान खानमुळे त्याने नकार दिला असे म्हटले जाते. या आधी विकेंडच्या वॉरमध्ये सलमान नसल्याने सिद्धार्थने त्या एपिसोडचे सुत्रसंचालन केले होते. आता असीमला विकेंडच्या वॉरचे सुत्रसंचालन करण्यासाठी बोलवण्यात आले होते पण सलमान खान तेथे नसल्यामुळे त्याने नकार दिला असे असीमने एका मुलाखतीदरम्यान सांगितले. यासंदर्भातील वृत्त स्पॉटबॉयने दिले आहे.

आणखी वाचा- हद्द झाली! कॅमेरासमोरच राखीने फाडले अभिनवचे अंतर्वस्त्र

दरम्यान, सलमानच्या अनुपस्थित सिद्धार्थने विकेंडच्या वॉरचे सुत्रसंचालन केले होते. सिद्धार्थने निक्की तांबोळी, राहुल वैद्य आणि अली गोणीला अनेक गोष्टी सुनवल्या होत्या. सिद्धार्थसोबतच अभिनेता हर्ष लिंबाचिया, राघव जुयाल, अभिनेत्री रश्मी देसाई आणि टीना दत्ताही आले होते.