29 May 2020

News Flash

सुहाना खानच्या बॉलिवूड पदार्पणाबाबत करण जोहरचं ट्विट

खरंच शाहरुख खानची मुलगी या ‘बिग बॉस’ स्पर्धकाशी करणार रोमान्स?

गेल्या काही दिवसांपासून शाहरुख खानची मुलगी सुहाना खान हिच्या बॉलिवूड पदार्पणाची जोरदार चर्चा आहे. जान्हवी कपूर आणि अनन्या पांडेनंतर आता निर्माता-दिग्दर्शक करण जोहर हा सुहानालासुद्धा बॉलिवूडमध्ये लाँच करणार असं म्हटलं जात आहे. इतकंच नव्हे तर ती करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इअर ३’ या चित्रपटातून आपल्या सिनेकारकिर्दिची सुरुवात करणार अशी चर्चा आहे. परंतु या चर्चेवर आता करण जोहरनेच स्पष्टीकरण दिलं आहे.

अवश्य पाहा – १०वी पास असलेल्यांसाठी ‘इस्रो’मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; मिळणार ४५ हजार पगार

अवश्य वाचा – “बुलाती है मगर जाने का नहीं” असं म्हणणाऱ्या एक्स-बॉयफ्रेंडला अभिनेत्रीनं दिलं भन्नाट उत्तर

काय म्हणाला करण जोहर?

करणनं एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्याने ही केवळ अफवा असल्याचं म्हटलं आहे. “मी ‘स्टुडंट ऑफ द इअर ३’मधून सुहानाला लाँच करणार नाही आहे. या केवळ अफवा आहेत. मी सर्वांना विनंती करतो की अशा खोट्या बातम्या पसरवणं थांबवा.” अशा आशयाचं ट्विट करणनं केलं आहे.

अवश्य पाहा – अन् नेहा कक्करनं दिली दोन-दोन हजारांच्या नोटेची भीक

अवश्य पाहा – Mr India 2 मध्ये ‘मोगॅम्बो खुश हुआ’ म्हणणार ‘हा’ आघाडीचा अभिनेता

‘स्टुडंट ऑफ द इअर’ या चित्रपटातून प्रत्येक वेळी नवीन चेहरे बॉलिवूडला मिळाले. पहिल्या चित्रपटातून आलिया भट्ट, वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्राने पदार्पण केलं होतं. तर दुसऱ्या चित्रपटातून अनन्या पांडे आणि तारा सुतारियाने करिअरला सुरुवात केली. आता तिसऱ्या चित्रपटातून सुहाना आणि बिग बॉस फेम असिमच्या करिअरला सुरुवात होणार अशी चर्चा होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2020 4:26 pm

Web Title: asim riaz suhana khan student of the year 3 karan johar mppg 94
Next Stories
1 शंतनूला बोगस इमेलचा फटका!
2 आईवडिलांनी आलियाला जिहादी राजकारणाच शिक्षण दिलंय; कंगनाच्या बहिणीचे धक्कादायक ट्विट
3 ‘फत्तेशिकस्त’ची गरुड झेप; मराठा लाइट इन्फान्ट्रीमध्ये झाला समावेश
Just Now!
X