23 February 2019

News Flash

‘अब तक ५६’च्या पटकथा लेखकाची आत्महत्या

वर्सोवा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रविशंकर आलोक

२००४ साली प्रदर्शित झालेल्या ‘अब तक ५६’ या चित्रपटाचे पटकथा लेखक रविशंकर आलोक यांनी आत्महत्या केली आहे. नैराश्यातून रविशंकर यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

रविशंकर मुंबईतील अंधेरी पश्चिमेकडे असलेल्या सात बंगला परिसरात असलेल्या वसंत सोसायटीमध्ये त्यांच्या भावाबरोबर भाड्याने राहत होते. ही इमारत सात मजल्याची असून या इमारतीच्या टेरेसवरुन उडी मारुन त्यांनी आत्महत्या केली आहे. याप्रकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसापासून तणावात असणाऱ्या रविशंकर यांच्यावर डॉ.पाटकर उपचार करत होते. त्यामुळे त्यांनी नैराश्यात येऊनच हे पाऊल उचलले असेल असा अंदाज पोलिसांनी वर्तविला असून त्यांच्या मृतदेह शवविच्छेदनासाठी कपूर रुग्णालयात नेण्यात आला आहे.

First Published on July 12, 2018 8:24 am

Web Title: assistant director ravi shankar alok commit suicides