पडद्यावर झळकणाऱ्या कोणत्याही कलाकाराला आंतरराष्ट्रीय चित्रपटामध्ये झळकण्याची इच्छा असते. त्यांचं काम हे चित्रपट, मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचतही असतं. त्यामुळे आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये त्याला काम मिळण्याची संधी जास्त असते. परंतु जे पडद्यामागे राहून कलाविश्वासाठी मोलाचं योगदान देतात त्यांच्या वाट्याला मात्र ही संधी फार कमी वेळा येते. परंतु पडद्यामागे राहून सुद्धा आंतरराष्ट्रीय चित्रपटामध्ये झळकण्याची संधी पुण्याच्या सिद्धार्थ बडवेला मिळाली आहे.

सिद्धार्थ लवकरच ‘एसकेप फ्रॉम ब्लॅक वॉटर’ या हॉलिवूडपटात झळकणार आहे. या चित्रपटामध्ये तो मुख्य भूमिकेत झळकणार असून या चित्रपटामध्ये काम करणारा तो एकमेव भारतीय कलाकार असणार आहे. लहानपणापासून अभिनयाची आवड असलेला सिद्धार्थने बालनाट्यांमध्ये काम करुन आपल्या अभिनयाची आवड जोपासली. या काळात पुण्यात आर्किटेक्चरची पदवी घेत असतानाच त्याने फिरोदिया आणि पुरुषोत्तम अशा एकांकिका स्पर्धांमधून त्याने त्याच्या अभिनयाची कारकिर्द सुरु ठेवली. विशेष म्हणजे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अब्बास मस्तान यांच्या ‘मशीन’ यांच्या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. मात्र त्याच्या मनात अभिनेता होण्याचं स्वप्न कायम होतं.

वाचा : ‘हा’ आहे जगातला सर्वात महाग साबण

‘मशीन’प्रमाणेच त्याने ‘हृदयांतर’ या चित्रपटांसाठीही सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे. विशेष म्हणजे ‘लग्न कल्लोळ’ या चित्रपटासाठी सहदिग्दर्शक म्हणून काम करत असतानाच त्याची निवड ‘एसकेप फ्रॉम ब्लॅक वॉटर’ या हॉलिवूडपटासाठी झाली. एलिस फ्रेझीर हे ‘एसकेप फ्रॉम ब्लॅक वॉटर’ या चित्रपटातील एका भूमिकेसाठी उत्तम कलाकाराच्या शोधात होते. याचवेळी आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेता छायाचित्रकार दिलशाद व्ही. ए. यांनी सिद्धार्थचं नाव सुचवलं. त्यानंतर एलिस यांना सुद्धार्थचा अभिनय आवडला आणि त्यांनी चित्रपटातील महत्त्वाच्या भूमिकेसाठी सिद्धार्थची निवड केली.

वाचा : क्रिती सेनॉन आई होणार? फोटो व्हायरल

“माझी कारकिर्द ही फारच वेगळी म्हणावी लागले. सह दिग्दर्शक ते अभिनेता हा प्रवास खरंच रोमांचकारी होता. हे सर्व करत असताना मला वाटलं ही नव्हतं कि मी एक हॉलिवूडचा सिनेमा करेन. मात्र अथक परिश्रम केले की नशीब साथ देतं ते खरं आहे. अनेक वर्ष वाट पाहिल्यानंतर मोठ्या पडद्यावर स्वतःला पाहता येणार आहे. ही खरंच आनंदाची गोष्टी आहे. परंतु खरा आनंद तेव्हाच होईल जेव्हा माझ्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसेल. या प्रवासात मला जॉनी लीव्हर सर, अब्बास मस्तान सर, एलिस फ्रेझर सर, यांनी केलेलं मार्गदर्शन कामी आलं, असं सिद्धार्थने सांगितलं.