News Flash

‘एक होती राजकन्या’ मध्ये आस्ताद काळेची एण्ट्री

पत्रकार असलेल्या या नव्या पात्राचे नाव आहे 'पुष्कराज'.

आस्ताद काळे

सोनी मराठी वाहिनीवरील ‘एक होती राजकन्या’ मधील ‘अवनी’ने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. प्रेक्षकांच्या लाडक्या राजकन्येचा हा प्रवास दिवसेंदिवस रंगतदार होत चालला आहे. त्यामध्येच एका ‘खास’ नवीन पात्राने मालिकेत एण्ट्री केली आहे. पत्रकार असलेल्या या नव्या पात्राचे नाव आहे ‘पुष्कराज’. अभिनेता आस्ताद काळे ही भूमिका साकारणार आहे. पुष्कराजची ‘हटके’ एण्ट्री आणि अवनीशी झालेल्या भेटीमुळे प्रेक्षकांची उत्सुकता निश्चितच ताणली गेली आहे.

‘एक होती राजकन्या’ मालिका अगदी अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. कर्तव्यनिष्ठ, साधी, हळवी अशी बाबांची लाडकी राजकन्या अवनी सगळ्यांनाच भावली आहे. आतापर्यंत झालेल्या एपिसोड्स मधून अवनीचा स्वभाव, तिच्या घरचे वातावरण, तिचे पोलीस खात्यात वावरणे प्रेक्षकांच्या चांगलेच ओळखीचे झाले आहे. अवनीच्या या छोट्याश्या जगात आता एका नवीन पात्राची भर पडली आहे. मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये आस्ताद काळे साकारत असलेल्या पुष्कराजची एण्ट्री म्हणजे प्रेक्षकांसाठी सुखद धक्काच आहे. पुष्कराज पोलीस ठाण्यात बातमी शूट करत असताना अवनी अनवधानाने त्याच्या वाटेत येते. अवनी आणि पुष्कराजची ही प्रोमोत दिसलेली ओझरती भेट बरंच काही सांगून जाते. पुष्कराज पोलिसांशी बोलत असताना अवनीच्या वडिलांचा संदर्भ आलेला प्रोमोत दिसतो. त्यामुळे तो आणि अवनी त्यांची भेट व्हायच्या आधीच एका अदृश्य धाग्याने बांधले गेले आहेत असे प्रेक्षकांना वाटत आहे. वरवर पाहता साधी वाटणारी ही अचानक झालेली छोटीशी भेट कोणते वळण घेईल, का ती एका नव्याच कथानकास सुरुवात करेल, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

पुष्कराज आणि अवनीची भेट अचानक झाली असली तरी अवनीला पुष्कराजबद्दल आधीपासूनच आदरयुक्त कुतुहूल आहे. पण पुष्कराज नक्की कोण आहे, त्याचा भूतकाळ काय आहे आणि त्याच्या अचानक येण्याचा हेतू काय असे अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहेत. अवनी आणि पुष्कराज मध्ये कशा प्रकारचा संवाद होतो, त्यांच्यात कसे नाते निर्माण होते यावर प्रेक्षकांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरे अवलंबून आहेत. कदाचित पुष्कराजचा मालिकेतील प्रवेश मालिकेला एकदम कलाटणी देखील देऊ शकेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2019 7:15 pm

Web Title: astad kale entry in ek hoti rajkanya sony marathi serial
Next Stories
1 हॉलिवूडची गर्भश्रीमंत अभिनेत्री झाली फकीर
2 धगधगत्या निखाऱ्यातून फुलणारी रांगडी प्रेमकथा
3 कतरिनामुळे ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’मधून माझी गच्छंती- सरोज खान
Just Now!
X