News Flash

केएल राहुलच्या वाढदिवशी अथिया शेट्टीची ‘खास’ पोस्ट व्हायरल

पाहा फोटो

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीने क्रिकेटर केएल राहुलच्या वाढदिवशी या दोघांचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. अथिया शेट्टीने केएल राहुलसाठी कॅप्शनमध्ये एक गोंडस संदेश देखील लिहिला आहे. या दोघांचे हे फोटो पुन्हा एकदा इंटरनेटवर खूप व्हायरल होत आहेत. आज राहुलने 29व्या वर्षात पदार्पण केले.

अथियाची पोस्ट

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Athiya Shetty (@athiyashetty)

”ग्रेटफुल फॉर यू…हॅपी बर्थडे”, असे अथियाने या पोस्टमध्ये म्हटले आहे. अथिया आणि केएल राहुल दोघेही खूप चांगले मित्र आहेत. दोघांचे याआधीही फोटो खूप व्हायरल झाले आहेत. चाहत्यांकडून सोशल मीडियावर या दोघांच्या मैत्रीबाबत सतत चर्चा होत असते.

पहिला भारतीय फलंदाज…

एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण सामन्यात शतक ठोकणारा केएल राहुल पहिला भारतीय फलंदाज आहे. आतापर्यंतच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत राहुलने 12 शतके आणि 32 अर्धशतके झळकावली आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या 5072 धावा आहेत.

 

केएल राहुल अलीकडच्या काळात मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा यशस्वी फलंदाज बनला आहे. केएल राहुलने सलामीवीर म्हणून स्वत: ला सिद्ध केले आहे. कसोटीतही 5 शतके ठोकण्यात राहुलला यश आले आहे. कसोटी व्यतिरिक्त राहुलची एकदिवसीय क्रिकेटमध्ये 5 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 2 शतके आहेत. सध्या राहुल आयपीएलमध्ये पंजाब किंग्जचे नेतृत्व करत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2021 4:03 pm

Web Title: athiya shetty shared a fun picture on kl rahuls birthday adn 96
Next Stories
1 VIDEO : बेअरस्टोच्या षटकारामुळे मोडला हैदराबादचा फ्रिज!
2 IPL 2021: विराटसेनेचं कोलकात्यावर वर्चस्व; ३८ धावांनी केलं पराभूत
3 क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांना करोनाची लागण
Just Now!
X