30 October 2020

News Flash

अथिया शेट्टीने पोस्ट केला स्वीमसूटमधला फोटो; के. एल. राहुलच्या कमेंटने वेधलं सर्वांचं लक्ष

के. एल. राहुलची हटके कमेंट

अथिया शेट्टी आणि के. एल. राहुल

बॉलिवूड आणि क्रिकेट या दोन क्षेत्रांचं नातं तसं फार जवळचं आहे. बॉलिवूड आणि क्रिकेटमधल्या बऱ्याच जोड्या आजवर चर्चेत राहिल्या आहेत. या जोड्यांपैकी विराट कोहली- अनुष्का शर्मा, जहीर खान-सागरिका घाटगे आणि युवराज सिंग- हेजल कीच यांनी लग्नगाठसुद्धा बांधली आहे. त्यातच आता अथिया शेट्टी व क्रिकेटर के. एल. राहुल या दोघांच्या अफेअर्सच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. सुनील शेट्टी यांची मुलगी व अभिनेत्री अथिया शेट्टी हिने सोशल मीडियावर नुकताच एक फोटो पोस्ट केला आहे. तिच्या या फोटोवर के. एल. राहुलने दिलेली प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरतोय.

या फोटोमध्ये अथिया स्वीमसूटमध्ये दिसत असून आरशात पाहताना तिने सेल्फी काढला आहे. तिच्या या फोटोवर इंडस्ट्रीतल्या काही कलाकारांनीसुद्धा कमेंट्स केल्या आहेत. मात्र या सर्व कमेंट्समध्ये के. एल. राहुलने केलेली कमेंट विशेष लक्ष वेधून घेत आहे. त्याने अथियाच्या या फोटोवर ‘जेफा’ (Jefa) अशी कमेंट केली आहे. आता या जेफाचा अर्थ नेमका काय असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. तर Jefa हा स्पॅनिश शब्द असून त्याचा अर्थ ‘बॉस’ असा होतो.

अथिया व के. एल. राहुलने रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली आतापर्यंत दिली नाही. एका मुलाखतीत अथिया म्हणाली होती, “मला माझं खासगी आयुष्य सार्वजनिक करायला अजिबात आवडत नाही. मला माझं खासगी आयुष्य जपायला आवडतं. त्यामुळेच मला माध्यमांसमोर काही गोष्टी सांगायला आवडत नाही.”

अथियाने २०१५ बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिने ‘हीरो’ चित्रपटात पहिल्यांदा काम केलं. ती ‘मुबारक’ आणि ‘मोतीचूक चकनाचूर’ या चित्रपटांतही दिसली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2020 10:21 am

Web Title: athiya shetty shares stunning pic in a swimsuit here is what rumoured boyfriend kl rahul has to say ssv 92
Next Stories
1 अभिनेत्यासोबत लीप लॉक सीनमुळे चर्चेत आला होता रणदीप हुड्डा
2 अनुभवातून शिकणे हेच जगणे!
3 सीबीआय पथक आज मुंबईत?
Just Now!
X