27 September 2020

News Flash

अथिया-के.एल राहुलच्या फोटोवर सुनील शेट्टीने दिली ‘ही’ कमेंट

सुनील शेट्टीने पहिल्यांदाच कमेंट दिली आहे

गेल्या काही दिवसापासून बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटपटू के. एल. राहुल यांच्या दोघांच्या अफेअर्सच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. बऱ्याच वेळा हे दोघं एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. अलिकडेच राहुलने अथियासोबतचा पुन्हा एक नवा फोटो शेअर केला. विशेष म्हणजे या फोटवर अभिनेता सुनील शेट्टीने पहिल्यांदाच कमेंट केली.

राहुले इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये ते दोघंही एका टेलिफोन बूथवर असल्याचं दिसून येत. यात राहुल फोनवर बोलत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर अथिया मोठमोठ्याने हसत आहे. हा फोटो शेअर करत राहुलने एक भन्नाट कॅप्शन दिलं. हेच कॅप्शन पाहून सुनील शेट्टीने कमेंट केली.

 

View this post on Instagram

 

Hello, devi prasad….?

A post shared by KL Rahul (@rahulkl) on


काय होती सुनील शेट्टीची कमेंट?

राहुलने शेअर केलेल्या फोटोला ‘हॅलो,देवीप्रसाद…?’ असं कॅप्शन दिलं आहे. जे पाहून सुनील शेट्टीला हसू अनावर झालं. सहाजिकच आहे. ‘हॅलो,देवीप्रसाद…?’ हे वाक्य सुनील शेट्टीच्या लोकप्रिय ‘हेराफेरी’ या चित्रपटातील आहे. हा डायलॉग प्रेक्षक आजही विसरले नाहीत. त्यामुळे राहुलने फोटोला दिलेलं कॅप्शन पाहून सुनील शेट्टीने त्यावर हसण्याच्या इमोजी कमेंट म्हणून केल्या आहेत.

दरम्यान, अथियाने २०१५ बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तिने ‘हीरो’ चित्रपटात पहिल्यांदा काम केलं. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट यशस्वी झाला असून ती ‘मुबारक’ चित्रपटातही दिसली.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2019 12:01 pm

Web Title: athiya shettys dad suniel shetty reacts to kl rahuls instagram post with daughter ssj 93
Next Stories
1 राजेश खन्ना यांना होते ज्योतिषविद्येचे ज्ञान अन् पाककलेची आवड
2 राजेश खन्ना यांना का म्हणायचे ‘काका’ माहितीये?
3 भविष्य निघाले इतिहासाकडे!
Just Now!
X