अभिनेता स्वप्नील जोशीचं इंस्टाग्राम अकाऊंट हॅक करण्याचा प्रयत्न झाला आहे. मात्र हा प्रयत्न स्वप्नीलच्या आयटी टीमला वेळीच लक्षात आल्याने फसला आहे. अभिनेता स्वप्नील जोशीने इंस्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली आहे. तसंच आपलं अकाऊंट हॅक करण्याचा प्रयत्न कसा झाला आणि ते अकाऊंट व्हेरिफाइड असूनही कसं फसवण्याचा प्रयत्न झाला हे देखील सांगितलं आहे. वारंवार पासवर्ड मागण्याचा प्रयत्न झाला असल्याचंही स्वप्नील जोशीने स्पष्ट केलं. काल रात्री अकाऊंट हॅक झाल्याचा प्रयत्न झाल्याचं स्वप्नील जोशीने सांगितलं आहे. जे घडलं ते दुर्दैवी आहे आहे असंही स्वप्नील जोशीने म्हटलं आहे.

पाहा व्हिडीओ

 

View this post on Instagram

 

A post shared by

 

 

नेमकं काय म्हटलं आहे स्वप्नील जोशीने?

“”काल रात्री माझं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक करण्याचा प्रयत्न झाला. माझ्या सोशल मीडियाच्या टीमच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न आम्ही हाणून पाडला. इन्स्टाग्राम सपोर्ट नावाचं व्हेरिफाइड अकाऊंट आहे, त्यावरुन मला वारंवार पासवर्ड विचारला गेला. मात्र मी पासवर्ड शेअर केला नाही. माझ्या सोशल मीडिया टीममुळे समजलं की हे सगळं बनावट आहे. मी कोणताही पासवर्ड शेअर केला नाही. तसंच कोणताही फॉर्म भरला नाही. तुम्हीही असा काही प्रकार तुमच्यासोबत होऊ शकतो. एक क्षणासाठी मला वाटलं की माझं अकाऊंट आता गेलं. पण सुदैवाने असं काही झालं नाही. हा सगळा प्रकार दुर्दैवी आहे. तुमच्यासोबत असा काही प्रकार घडला तर काळजी घ्या. कोणाही सोबत पासवर्ड शेअर करु नका” असंही स्वप्नील जोशीने म्हटलं आहे.”