News Flash

अतुल कुलकर्णीची मल्याळम ‘जर्नी’ प्रेक्षकांच्या भेटीला

भाऊ- बहिणीच्या नात्यावर अलगद फुंकर मारत नात्यांच्याच अनपेक्षित पण तितक्याच सुखद प्रवासावर नेणारा हा चित्रपट

अतुल कुलकर्णी, koode

चतुरस्त्र अभिनेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अतुल कुलकर्णीचा मल्याळम चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘हॅपी जर्नी’ या मराठी चित्रपटाच्याच कथानकावर या मल्याळम चित्रपटाचं कशानक आधारित असून, ‘कूडे’ असं त्याचं नाव आहे. खुद्द अतुलनेच त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन याविषयीची माहिती दिली.

अंजली मेनन दिग्दर्शित ‘कूडे’ हा माझा मल्याळम चित्रपट आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. महाराष्ट्रात हा चित्रपट इंग्रजी सबटायटल्ससह प्रदर्शित होणार आहे, तो नक्की पाहा, असं त्याने फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे. ‘कूडे’चा टीझर प्रदर्शित झाल्यापासूनच त्या चित्रपटाची तुलना ‘हॅपी जर्नी’ या चित्रपटाशी करण्यात आली होती.

वाचा : चाचा- चाचींना सलाम: १३ हजार फुटांवर जवळपास ४५ वर्षे चालवतायेत ढाबा

सचिन कुंडलकर दिग्दर्शित ‘हॅपी जर्नी’ या चित्रपटामध्ये अभिनेत्री पल्लवी सुभाष, प्रिया बापट आणि अतुल कुलकर्णी यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. ‘कूडे’मध्ये या भूमिका अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन आणि नजरिया साकारणार आहेत. भाऊ- बहिणीच्या नात्यावर अलगद फुंकर मारत नात्यांच्याच अनपेक्षित पण तितक्याच सुखद प्रवासावर नेणारा हा चित्रपट आणि त्यातील अतुलची भूमिका आता प्रेक्षकांना भावणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 20, 2018 6:10 pm

Web Title: atul kulkarnis malayalam movie koode is an adaptation of the marathi film happy journey
Next Stories
1 Video : कोण ठरणार ‘बिग बॉस मराठी’चा विजेता, पाहा प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
2 Bigg Boss Marathi : बिग बॉस मराठीमुळे ‘त्यांची’च चर्चा
3 भाडेकरुचा रणबीरवर आरोप, केली ५० लाखांची मागणी
Just Now!
X