मराठी रंगभूमीवरील फार्ससम्राट बबन प्रभू यांचे ‘दिनूच्या सासूबाई राधाबाई’ हे लोकप्रिय नाटक जुनं ते सोनं म्हणत आता नव्याने रंगभूमीवर आले आहे. विनोदाचा बादशहा संतोष पवार याने या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. मुंबईत शुभारंभ झालेल्या या नाटकाने अलीकडेच गोवा आणि कोकण दौरा गाजविला आहे.

नव्या रुपात रंगभूमीवर आलेल्या या नाटकाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे, अभिनेता विनय येडेकर आणि दिग्दर्शक संतोष पवार हे विनोदाचे तीन हुकमी एक्के या नाटकाच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. नयना आपटे आणि विनय येडेकर हे कलावंतही या नाटकाद्वारे प्रथमच रंगभूमीवर एकत्र काम करत आहेत. तसेच, आतापर्यंत अनेक नाटकांतून भूमिका केलेले विनय येडेकर यांनी पहिल्यांदाच संतोष पवार यांच्या दिग्दर्शनाखाली नाटकात काम केले आहे.

out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
Raj Thackerey teaser
VIDEO : राज ठाकरे- अमित शाह यांच्या बैठकीत काय ठरलं? शिवतीर्थवरून मिळणार उत्तर, पाहा पाडवा मेळाव्याचा टीझर!
nagpur crime news, suspicion of character nagpur
प्रेमविवाहानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीने पत्नीला पाजले विष, पोलिसांनी…
Sharmila Pawar
अजित पवारांच्या सख्ख्या वहिनी आता सुप्रिया सुळेंच्या प्रचारात; म्हणाल्या, “आपल्या माहेरवाशिणीला…”

वाचा : ब्रिटनच्या शाही विवाहसोहळ्याला ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीची उपस्थिती

दिग्दर्शनाची धुरा सांभाणारा संतोष पवार या नाटकात ‘दिनू नाडकर्णी’ ही भूमिका साकारत आहेत. ‘डॉ. नाय’ यांच्या भूमिकेत अभिनेते विनय येडेकर आहेत. नाट्यकर्मी विलास देसाई यांच्यासह इरावती लागू, रोनक शिंदे, वैभवी देऊलकर-धुरी, ऋतुंधरा माने, दीपश्री कवळे हे नव्या दमाचे कलावंतही या नाटकात भूमिका रंगवित आहेत. ‘श्री विश्वस्मै प्रॉडक्शन’ आणि ‘वेद प्रॉडक्शन्स’ यांनी या नाटकाची निर्मिती केली आहे. नाटकाचे नेपथ्य प्रसाद वालावलकर यांचे आहे. पार्श्वसंगीत साई पियुष यांचे; तर शीर्षक गीत व संगीत अभिनय देसाई यांचे आहे.