गेल्या आठवडय़ात प्रदर्शित झालेला ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘देवमाणूस’ या मालिकेचा प्रोमो वेगळ्याच कारणाने गाजला. प्रोमोमध्ये दाखवलेल्या हिंसक दृश्याविरोधात प्रेक्षकांनी जाहीर नाराजी व्यक्त के ली. प्रेक्षकांनी समाजमाध्यमांवरून व्यक्त के लेल्या प्रतिक्रियांमुळे वाहिनीने हा प्रोमो मागे घेतला आहे.

‘झी मराठी’ वाहिनीवर रात्री साडेदहा वाजता ‘रात्रीस खेळ चाले २’ ही मालिका दाखवण्यात येते. २९ ऑगस्टला या मालिके चा अखेरचा भाग प्रदर्शित होणार असून त्याजागी ‘देवमाणूस’ ही नविन मालिका दाखवण्यात येणार आहे. ‘लागीरं झालं जी’ फे म अभिनेता किरण गायकवाडची प्रमुख भूमिका असलेली ही मालिका सुरू होण्यापूर्वीच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. गेल्या आठवडय़ापासून मालिकेचा प्रोमो टीव्हीवर दाखवण्यात येत होता. या प्रोमोत एक साधाभोळा डॉक्टर गोड गोड बोलून एका महिलेची हत्या करतो, असे यात दाखवण्यात आले आहे. मात्र हत्येचे हे दृश्य प्रतीकात्मक न दाखवता हिंसक पध्दतीने दाखवण्यात आले आहे. सध्या करोनामुळे सर्व प्रेक्षक घरी असल्याने सहकुटुंब मालिका पाहतात. सततच्या या प्रोमोमुळे लहान मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. मनोरंजनाच्या नावाखाली पराकोटीचा घातपात दाखवणे कितपत योग्य आहे?, असा सवाल करत काही प्रेक्षकांनी समाजमाध्यमांवरून याबद्दल टीका सुरू के ली होती.

नेटक ऱ्यांनी ट्विटरवर #डीअ‍ॅक्टिव्हेट झीमराठी आणि #देवमाणूस हे हॅशटॅग लोकप्रिय केले आहेत. इतक्या मोठय़ा प्रमाणावर ‘देवमाणूस’च्या या पहिल्या प्रोमोविषयी नकारात्मक प्रतिक्रिया उमटल्याने झी मराठी वाहिनीने हा प्रोमो मागे घेतला आहे. त्याऐवजी वाहिनीने सत्य घटनेवर प्रेरित असा उल्लेख करून दुसरा प्रोमो चालवला आहे. अर्थातच, समाजमाध्यमांवरील या नकारात्मक प्रतिक्रियांमुळे मालिकेला चांगलाच फायदा झालेला पहायला मिळतो आहे. या मालिके चा प्रोमो आणि त्यावरून झालेली चर्चा यामुळे मालिके विषयी प्रेक्षकांच्या मनात उत्कं ठा निर्माण झाली आहे हेही तितके च खरे.