News Flash

बिग बींचे करोनाविषयी जागृती करणारे ‘ते’ होर्डिंग्स हटविले; कारण…

....म्हणून करोनाविषयी जागृकता निर्माण करणारे बिग बींचे होर्डिंग्स हटविले

उस्मानाबाद जिल्ह्यातील एका गावात करोनाविषयी जनजागृती करण्यासाठी लावण्यात आलेले अमिताभ बच्चन यांचे होर्डिंग्स हटविण्यात आले आहेत. ‘जिस डॉन को पकडना मुश्किल ही नहीं, बल्कि नामुमकिन था, उसे कोरोना वायरस ने पकड लिया… ‘अशा आशयाचे काही होर्डिंग्स गावात लावण्यात आले होते. मात्र यामुळे बिग बींच्या चाहत्यांच्या भावना दुखावल्यामुळे हे होर्डिंग्स हटविण्यात आल्याचं ‘एनडीटीव्ही’च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

अमिताभ बच्चन यांना करोनाची लागण झाल्यानंतर गावामध्ये अमिताभ बच्चन यांचे काही होर्डिंग्स लावण्यात आले होते. यामध्ये बिग बींच्या फोटोसोबत त्यांच्या ‘डॉन’ चित्रपटातील गाजलेला संवाद जनजागृती करण्याच्या उद्देशाने वापरण्यात आला होता. परंतु, त्याची शब्दरचना बदलण्यात आली होती. ज्यामुळे बिग बींच्या चाहत्यांच्या भावना दुखावल्याचं म्हटलं गेलं. त्यानंतर हे होर्डिंग हटविण्यात आले.

“जिस डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं, बल्कि नामुमकिन था, त्यालाच करोनाने विळख्यात ओढलं आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबासाठी घरी रहा आणि विनाकारण घराबाहेर पडून डॉन होण्याचा प्रयत्न करु नका”, असं होर्डिंग गावामध्ये लावण्यात आलं होतं. हे होर्डिंग जरी जनजागृतीसाठी असले, तरीदेखील बिग बींच्या चाहत्यांच्या भावना दुखावल्याचं पाहायला मिळालं.

“करोनाविषयी नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या हेतूने आम्ही हा बॅनर डिझाइन केला होता. मात्र, अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांच्या भावनांचा आदर करत आम्ही ते बॅनर हटविले आहेत”, असं लोहारा नगर पंचायत मुख्य अधिकारी गजानन शिंदे यांनी सांगितलं. दरम्यान, बिग बींना करोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वत: दिली. त्यांच्यासोबतच अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय-बच्चन आणि राध्या बच्चन यांनादेखील करोनाची लागण झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2020 9:10 am

Web Title: aurangabad maharashtra amitabh bachchan hoardings removed on awareness of coronavirus ssj 93
टॅग : Coronavirus
Next Stories
1 करोनोत्तर नाटय़सृष्टीस राजाश्रयाची निकड
2 ‘चांगल्या ठिकाणी पोहोचण्याचा आनंद’
3 घरच्या घरी फर्स्ट डे, फर्स्ट शो
Just Now!
X