ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ मराठी साहित्यिक, नाटककार वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस (२७ फेब्रुवारी) ‘मराठी भाषा दिन’ म्हणून राज्यात साजरा करण्यात येतो. झी मराठी वाहिनीवर या दिवसाच्या निमित्ताने रविवार, २८ फेब्रुवारी रोजी कुसुमाग्रज यांचा जीवनप्रवास उलगडणाऱ्या ‘प्रवासी पक्षी’ या लघुपटाचे प्रसारण केले जाणार आहे. कुसुमाग्रज अभिवादन या कार्यक्रमाअंतर्गत दुपारी एक वाजता हा लघुपट पाहायला मिळणार आहे.

डॉ. जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेल्या या लघुपटात कुसुमाग्रज यांच्या जीवनप्रवासातील विविध टप्पे दस्तुरखुद्द त्यांच्याच मुलाखतीमधून प्रेक्षकांसमोर येणार आहेत. डॉ. जब्बार पटेल आणि ना. धों. महानोर यांनी त्यांच्याशी संवाद साधला असून १९९० च्या दशकात डॉ. जब्बार पटेल यांनी हा लघुपट तयार केला होता. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची निर्मिती असलेल्या या लघुपटात कुसुमाग्रज आपल्या कवितांविषयीही भरभरून बोलले आहेत. शेक्सपिअरविषयी कुसुमाग्रज यांना आदर व प्रेम होते. शेक्सपिअरची स्वगते हे एक प्रकारचे काव्यच असल्याचे ते मानत असत. शेक्सपिअरबद्दलचे त्यांचे विचार यात ऐकायला मिळणार आहेत.

nashik, Adulterated Goods, Worth Rs 54 thousand, Adulterated Goods Seized, Adulterated prasad, Trimbakeshwar Adulterated prasad, nashik news,
त्र्यंबकेश्वरमध्ये ५४ हजार रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त
Loksatta editorial Government bans sugar mills from producing ethanol
अग्रलेख: धडाडांची धरसोड!
mahesh manjrekar
“सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चित्रपट बनवणार”, महेश मांजरेकरांचं वक्तव्य; शिवसेना-मनसेबाबतही केलं भाष्य
chandrachud
‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ सोहळा; सरन्यायाधीश चंद्रचूड प्रमुख अतिथि, विविध क्षेत्रांतील १८ प्रज्ञावंतांचा सन्मान

‘ऑथेल्लो’ (नाना पाटेकर व पूजा पवार), ‘कौतेय’ (विक्रम गोखले व रिमा), ‘वीज म्हणाली धरतीला’ (सुधा करमरकर व फैय्याज)या नाटकातील काही प्रसंगांसह ‘नटसम्राट’ या नाटकातील डॉ. श्रीराम लागू यांनी सादर केलेली स्वगते या वेळी पाहायला मिळणार आहेत. तर ‘कणा’ही कविता खुद्द कुसुमाग्रज यांच्या तोंडून तर ‘खरी कमाई’ या कवितेचा प्रसिद्ध कवी/गीतकार गुलजार यांनी केलेला अनुवाद ते स्वत: सादर करणार आहेत. तसेच साहित्य अकादमी आणि ज्ञानपीठ पुरस्कार सोहळ्याची काही क्षणचित्रे, त्यांची भाषणे ही दाखविली जाणार आहेत. ना. धो. महानोर, सोनाली कुलकर्णी, पांडुरंग घोटकर, रवींद्र साठे यांनी कुसुमाग्रज यांच्या काही कविताही या वेळी सादर केल्या आहेत. झी मराठी वाहिनीवर कुसुमाग्रज यांच्यावर सादर झालेल्या ‘नक्षत्रांचे देणे’ या कार्यक्रमातील काही भागाचाही समावेश लघुपटात करण्यात आला आहे.