News Flash

देसी गर्ल होणार सुपरगर्ल?, ‘माव्‍‌र्हल’ची प्रियांकाशी बोलणी सुरू

‘अ‍ॅव्हेंजर्स: एंडगेम'चे सहाय्यक दिग्दर्शक ज्यो रुसो यांनी वृत्ताला दुजोरा दिला आहे.

‘अ‍ॅव्हेंजर्स: एंडगेम’ या चित्रपटाची भारतीय चाहतेही आतुरतेने वाट पाहत आहेत. भारतात मार्व्हलच्या चित्रपटांचा मोठा चाहता वर्ग आहे मात्र या सुपरहिरोंच्या यादीत एकही भारतीय सुपरहिरो नाही. पण आता ‘माव्‍‌र्हल’च्या आगामी चित्रपटात अभिनेत्री प्रियांकाची वर्णी लागू शकते.

येत्या २६ एप्रिलला ‘अ‍ॅव्हेंजर्स: एंडगेम’ भारतात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनला मुंबईतून सुरूवात होणार झाली आहे. यावेळी मार्व्हल स्टुडिओ आगामी चित्रपटासाठी प्रियांकाच्या नावाचा विचार करत असल्याचं ज्यो रुसो म्हणाले. ज्यो हे ‘अ‍ॅव्हेंजर्स: एंडगेम’चे सहाय्यक दिग्दर्शक आहेत. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान भारतीय कलाकारांसोबत काम करायला आवडेल का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना त्यांनी प्रियांका चोप्राच्या कामाचं कौतुक केलं.
‘मला प्रियांका चोप्रासोबत काम करायला आवडेल. विशेष: म्हणजे एका प्रोजेक्टसाठी आमचं तिच्यासाठी बोलणं सुरूच आहे. हा प्रोजेक्ट काय असणार आहे हे मी तुम्हाला आता सांगणार नाही’ असं रुसो म्हणाले.  मार्व्हलसाठी भारतीय बाजारपेठ खूपच मोठी आहे इथल्या प्रेक्षकांनी आम्हाला भरभरून प्रेमही दिलंय अशा शब्दात रुसो यांनी कौतुक केलं आहे.

आता प्रियांका मार्व्हलच्या आगामी चित्रपटात दिसणार का हे पाहणं खूपच औत्सुक्याचं ठरणार आहे. यापूर्वी दीपिका पादुकोन हिनं सुपरहिरोपटांमध्ये काम करण्याची इच्छा बोलून दाखवली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2019 5:35 pm

Web Title: avengers endgame director joe russo confirms marvel is talking to priyanka chopra
Next Stories
1 ‘साथ दे तू मला’ मालिकेच्या शीर्षकगीताला प्रेक्षकांची पसंती
2 Video: आलियाने वरुणला केले ‘एप्रिल फूल’
3 ‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा
Just Now!
X