24 January 2020

News Flash

अॅव्हेंजर्स एंडगेम : भारतात दर सेकंदाला १८ तिकीटांच्या विक्रीचा रेकॉर्ड

एका दिवसात 'बुक माय शो'वर या चित्रपटाच्या तब्बल १० लाख तिकीटांची विक्री झाली आहे.

अॅव्हेंजर्स एंडगेम

माव्‍‌र्हल सिनेमॅटिक युनिव्हर्सचा Avengers: Endgame हा २०१९ मधील सर्वात मोठा चित्रपट येत्या २६ एप्रिलला प्रदर्शित होत आहे. तब्बल ३२ सुपरहिरो असलेल्या या सुपरहिरोपटात निर्मात्यांनी १००० कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. भारतात या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटाची अॅडव्हान्स तिकीट बुकींग सुरू झाली असून अल्पावधीतच या चित्रपटाने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. एका दिवसात ‘बुक माय शो’वर या चित्रपटाच्या तब्बल १० लाख तिकीटांची विक्री झाली आहे. हा आकडा कोणत्याही हिंदी चित्रपटापेक्षा जास्त आहे.

‘बुक माय शो’ या तिकीट बुकींग अॅपवर प्रत्येक सेकंदाला १८ तिकीटांची बुकींग झाली आहे. बुकींगच्या बाबतीत येत्या कालावधीत हा चित्रपट आणखी विक्रम प्रस्थापित करण्याची शक्यता ‘बुक माय शो’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष सक्सेना यांनी वर्तवली आहे.

आश्चर्याची बाब म्हणजे या चित्रपटाचे तिकिट महागडे असूनही हजारो चाहते ते विकत घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दिल्ली आणि मुंबईत चित्रपटाची क्रेझ जास्त असून या शहरांमध्ये तिकीटविक्री जोरदार सुरू आहे.

सुपरहिरोपटांसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘माव्‍‌र्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स’ने भारतीय प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच जागा निर्माण केली आहे. गेल्या १० वर्षांत त्यांनी प्रदर्शित केलेल्या जवळपास प्रत्येक सुपरहिरोपटाला भारतीय प्रेक्षकांनी मनापासून दाद दिली. आता चाहते ‘अ‍ॅव्हेंजर्स: एंडगेम’ची आतुरतेने वाट पाहात आहेत. याआधीच्या भागात खलनायक थेनॉसने पृथ्वीवरील अर्धी लोकसंख्या आणि सर्व सुपरहिरोंना मारल्याचे दाखवण्यात आले होते तर ‘अ‍ॅव्हेंजर्स : एंडगेम’मध्ये यानंतर काय होते? हे दाखवले जाणार आहे.

First Published on April 23, 2019 11:59 am

Web Title: avengers endgame sells 1 million advance tickets in india
Next Stories
1 …म्हणून ‘भारत’च्या ट्रेलरमधून तब्बू गायब
2 रिंकूला ‘या’ व्यक्तीच्या बायोपिकमध्ये करायचंय काम
3 ऑनस्क्रीन वैरिणी, ऑफस्क्रीन मैत्रिणी! माई आणि शेवंताची दुनियादारी
Just Now!
X