17 July 2019

News Flash

Avengers: Endgame Trailer : लड़ेंगे…आखरी सांस तक

कमी कालावधीमध्ये या ट्रेलरला मोठ्या प्रमाणावर व्ह्युज मिळाले आहेत.

बहुप्रतिक्षित ठरत असलेल्या कॅप्टन मार्वेलच्या एव्हेंजर्स सीरिजच्या चाहत्यांची प्रतीक्षा लवकरचं संपणार आहे. या सीरिजचा सर्वात मोठा हॉलिवूडपट अॅवेंजर्स -एंडगेम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून तत्पूर्वी या चित्रपटाचा हिंदीतील ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. विशेष म्हणजे काही तासांपूर्वी प्रदर्शित झालेला ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीत उतरत आहे. त्यामुळे कमी कालावधीमध्ये या ट्रेलरला मोठ्या प्रमाणावर व्ह्युज मिळाले आहेत.

मार्वेलच्या सुपरहिरोची गोष्ट जिथून सुरु होते तेथूनच अॅवेंजर्स-एंडगेमच्या ट्रेलरला खऱ्या अर्थाने सुरुवात होताना दिसते. एका गुफेत बनलेला आयर्नमॅन आणि एका इंजक्शनमुळे डीएनएत बदल होऊन धालेला कॅप्टन, त्याप्रमाणेच अमेरिका आणि अन्य ग्रहावरुन आलेले थोर, हॉक आय, ब्लॅक विडो या ट्रेलरमध्ये दिसत आहेत. विशेष म्हणजे आजही हे सारे सुपरहिरोज जगात असून आपल्या मित्रांच्या मृत्यूनंतर ते सारे जण एकजूट होतात. त्यातच त्यांना साथ मिळते ती कॅप्टन मार्वेलची. या सगळ्यामुळे या ट्रेलरची रंगत वाढली आहे. रुसो ब्रदर्सने २ मिनीटे २८ सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये संपूर्ण चित्रपट जणू दाखविला आहे.

दरम्यान, ‘अ‍ॅवेंजर्स- एंडगेम’चे लवकरच भारतात प्रमोशन होणार असून चित्रपटाचे दिग्दर्शक जो रूसो लवकरच या प्रमोशनसाठी भारतात येणार आहेत. हा चित्रपट येत्या २६ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

First Published on March 15, 2019 6:02 pm

Web Title: avengers endgame trailer hindi avengers 4 endgame official trailer