‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ हा सुपरहिरोपट इतिहासातील सर्वाधिक गाजलेल्या चित्रपटांपैकी एक होता. या चित्रपटात एकाच वेळी जवळपास ३३ सुपरहिरो धमाकेदार अ‍ॅक्शन करताना दिसले. परंतु शेकडो कोटींची कमाई करणाऱ्या या चित्रपटाला ऑस्करमध्ये मात्र जागा मिळवता आली नव्हती. परिणामी सुपहिरो चाहते नाराज होते. परंतु आनंदाची बाब म्हणजे यंदाच्या किड्स च्वॉईस पुरस्कारावर ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ने नाव कोरले आहे. म्हणजेच लहान मुलांच्या सर्वाधिक आवडत्या चित्रपटांमध्ये यंदा ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ पहिल्या क्रमांकावर आहे.

सर्वाधिक वाचकपसंती – “पायरेट्स ऑफ क्वारंटाईन”; श्रेयस तळपदेच्या डोळ्याला नक्की झालं तरी काय?

Obesity kid
सिडेंटरी लाईफस्टाईल, आऊटिंग, टेस्ट बड्स, स्क्रीन टाईममुळे मुलांचा स्थुलपणा वाढतो? पण म्हणजे काय?
ifs officer parveen kaswan shares video of forester extinguishing terrible forest fire goes viral
जंगलात लागली भयानक आग, झाडे झाली जळून खाक! आग शमविताना झाली वनकर्मचाऱ्यांची दमछाक, पाहा थरारक Video
Francoise Bettencourt Meyers
Richest Woman In The World : ‘या’ प्रसिद्ध कंपनीची सीईओ ठरली जगातील सर्वांत श्रीमंत महिला, संपत्ती वाचून व्हाल थक्क!
Crew box office collection day 1
‘क्रू’ चित्रपटाची दमदार सुरुवात, करीना-तब्बू-क्रितीची जुगलबंदी प्रेक्षकांना भावली, पहिल्या दिवशी केली जबरदस्त कमाई

सर्वाधिक वाचकपसंती – GOT मधील खलनायक खऱ्या आयुष्यात सुपरहिरो; केला वजन उचलण्याचा World Record

करोना विषाणूच्या वाढत्या प्रभावामुळे यंदाचा किड्स चॉईस पुरस्कार सोहळा वर्चुअली साजरा करण्यात आला. वर्षभरात ज्या चित्रपटांना लहान मुलांनी सर्वाधिक प्रतिसाद दिला अशा चित्रपटांना आणि कलाकारांना हा पुरस्कार प्रदान केला जातो. ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ सोबतच ‘स्पायडमॅन: फार फ्रॉम होम’मध्ये स्पायडरमॅनची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेता टॉम हॉलंडला यंदाचा सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कार मिळाला. तसेच स्ट्रेंजर्स थिंग्स यंदाची सर्वाधिक लोकप्रिय कौटुंबिक मालिका ठरली.

‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ला पुरस्कार मिळताच चित्रपटातील सुपरहिरोंनी एका व्हिडीओ चॅटव्दारे चाहत्यांचे आभार मानले. रॉबर्ट डाउनी ज्युनिअर, स्केर्लेट जॉन्सन, मार्क रफेलो, ख्रिस इव्हान, जेरेमी रेनर, हे कलाकार या व्हिडीओमध्ये आपले अनुभव सांगताना दिसत आहेत.