चित्रपटाचा आवाका जितका मोठा तीतकाच जास्त खर्च त्यांच्या निर्मितीसाठी करावा लागतो. आणि आर्थिक गुंतवणुक जर मोठी असले तर त्यातुन मिळणारा परतावा देखिल तीतकाच मोठा असावा असा एक साधा सरळ व्यवसायीक दृष्टीकोन मनाशी बाळगुन चित्रपट उद्योगात गुंतवणुक केली जाते. माव्‍‌र्हल सिनेमॅटिक युनिव्हर्सचा ‘अ‍ॅव्हेंजर्स: इन्फिनिटी वॉर’ हा २०१८ मधील सर्वात मोठा चित्रपट येत्या २७ एप्रिलला प्रदर्शित होत आहे. ४०पेक्षा जास्त सुपरहिरो असलेल्या या सुपरहिरोपटात निर्मात्यांनी १००० कोटींपेक्षा जास्त गुंतवणुक केली आहे. त्यामुळे व्यवसायिक दृष्टीकोनातुन विचार करता निर्मात्यांना गुंतवणुकीपेक्षा जास्त नफा मिळवणे अपेक्षित आहे. परंतु यावर तोडगा काढण्यासाठी निर्मात्यांनी चित्रपट प्रदर्शनाआधिच तिकीटीची थेट विक्री करण्यास सुरवात केली. २६ मार्च पासुन चित्रपटाचे अगाउ आरक्षण सुरु झाले. आणि आश्चर्याची बाब म्हणजे पहिल्या दोन दिवसांत अ‍ॅव्हेंजर्सने २०० कोटींची कमाई करत प्रदर्शनापुर्वीच सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट असा एक नविन विक्रम प्रस्थापित केला आहे.

याआधि द थर्टीन्थ वॉरियर, द फॉल ऑफ रोमन एम्पायर, द अ‍ॅडवेंचर ऑफ प्लुटो नॅश, ४७ रॉबिन यांसारखे अनेक चित्रपट आले. ज्यांचा आर्थिक आवाका अ‍ॅव्हेंजर्स इतकाच मोठा होता. परंतु ढिसाळ नियोजन व विक्री कौशल्यात काही त्रुटी राहिल्यामुळे वर्षातील सर्वात जास्त कमाई करणारे चित्रपट ठरुन देखिल निर्मात्यांना गुंतवणुकीपेक्षा जास्त नफा मिळवण्यात अपयश आले. परिणामी इतिहासातील सर्वात सुपरफ्लॉप सिनेमांचा शिक्का त्यांच्याबर बसला. ‘अ‍ॅव्हेंजर्स: इन्फिनिटी वॉर’ या सुपरहिरोपटाची घोषणा झाल्यापासुनच त्यात केल्या जाणाऱ्या खर्चाचे आकडे सातत्याने चर्चेत होते. जसजसा चित्रपटातील कलाकारांचा ताफा वाढत गेला तसतसा खर्चाचा आकडाही वाढत गेला. सध्या ही संख्या हजार कोटींच्या घरात जाउन बसली आहे. इतर उद्योगधंद्यांप्रमाणेच चित्रपट क्षेत्रातही नफा मिळवण्याच्या उद्देशानेच गुंतवणुक केली जाते.

सध्या एकुण गुंतवणुकीपैकी ४०टक्के रक्कम खिशात आली असली तरी अद्याप सिनेमा प्रदर्शीत होणे बाकी आहे. आजवर अनेक सिनेमा असे आले ज्यांनी प्रदर्शनापुर्वी अगाउ तिकीट विक्रीव्दारे चांगली कमाई केली. परंतु प्रदर्शनानंतर इंटरनेट पायरसी, खराब रिव्हु, आणि इतर चित्रपटांच्या दबावामुळे त्यांना अपेक्षित नफा मिळवता आला नाही. या पार्श्वभुमिवर विचार करता हीच बाब अ‍ॅव्हेंजर्सच्या बाबतीतही खरी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अपेक्षित सुरवात होउन देखिल अ‍ॅव्हेंजर्स निर्माते अद्याप दबावात आहेत.