23 September 2020

News Flash

‘कोर्ट’वर पारितोषिकांचा वर्षांव

या चित्रपटाला जगभरातील अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये मानाची पारितोषिके मिळाली आहेत. ७१ व्या व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाचा जागतिक प्रीमियर झाला.

| April 12, 2015 12:32 pm

*या चित्रपटाला जगभरातील अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये मानाची पारितोषिके मिळाली आहेत. ७१ व्या व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाचा जागतिक प्रीमियर झाला. या महोत्सवात ‘होरायझन्स’ विभागामध्ये सवरेत्कृष्ट चित्रपट म्हणून गौरव झाला. त्याचबरोबर दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे यांना ‘लायन ऑफ द फ्यूचर’ पारितोषिक देऊन व्हेनिस महोत्सवाने गौरविले. ‘व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात १९३७ साली प्रथमच भारतीय चित्रपट निवडण्यात आला होता. प्रभात फिल्म कंपनीचा ‘संत तुकाराम’ हा तो पहिला मराठी आणि पहिला भारतीय चित्रपट होय.

*६२ व्या राष्ट्रीय चित्रपट पारितोषिकांमध्ये असंख्य भारतीय चित्रपटांशी स्पर्धा करत ‘कोर्ट’ने देशातील सवरेत्कृष्ट चित्रपट पारितोषिकाचा बहुमान पटकावला.

*हाँगकाँग आशियाई चित्रपट महोत्सवात या चित्रपटाने ‘फीप्रेस्की पारितोषिक’ मिळविले. ‘फीप्रेस्की’  ही आंतरराष्ट्रीय चित्रपट समीक्षक संघटना असून या संघटनेतर्फे जगभरातील विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये समितीची नेमणूक करून या समितीतर्फे ‘फीप्रेस्की पारितोषिक’ दिले जाते.

*मुंबई अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात ‘मामि’ या प्रतिष्ठेच्या महोत्सवात देखील सवरेत्कृष्ट चित्रपट, सवरेत्कृष्ट दिग्दर्शक अशी पारितोषिके या चित्रपटाने पटकावली.

*त्याशिवाय सर्बिया, मॉस्को, सिंगापूर, मेक्सिको येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्येही पारितोषिकांचा वर्षांव झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2015 12:32 pm

Web Title: awards to court
टॅग Court
Next Stories
1 सुपरहिरो चित्रपट मालिकांची निर्मिती अधिक आव्हानात्मक
2 ‘फास्ट अँड फ्युरिअस ७’ चित्रपटाची १०० कोटींची कमाई
3 चाळकरी शाहरुख
Just Now!
X