News Flash

“शुटिंगदरम्यान मला धमकावले जायचे”; अभिनेत्रीने सांगितला बॉलिवूडमधील धक्कादायक अनुभव

घराणेशाहीला कंटाळून अभिनेत्री बॉलिवूडला ठोकला रामराम

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने गळफास घेऊन आत्महत्या केली. बॉलिवूडमधील घराणेशाहीला कंटाळून त्याने आत्महत्या केली असं म्हटलं जात आहे. दरम्यान सिनेसृष्टीतील घराणेशाहीवर आता अनेक कलाकार उघडपणे बोलू लागले आहेत. असाच काहीसा अनुभव अभिनेत्री आयशा टाकिया हिने सांगितला आहे. तिला देखील फिल्मी बॅकग्राऊंड नसल्यामुळे बॉलिवूडमधून बाहेर काढण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या.

सलमान खानच्या ‘वॉन्टेड’ या चित्रपटातून नावारुपास आलेल्या आयशाने अल्पावधीतच बॉलिवूडला राम राम ठोकला. यासाठी तिने बॉलिवूडमधील घराणेशाहीला जबाबदार ठरवले आहे. तिने आपले अनुभव एका इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून सांगितले आहेत.

 

View this post on Instagram

 

Having personally been through many incidents of trolling and workplace bullying…I wish to spread the word about this and I want you to speak up please if someone is making you feel less , small or worthless. Please know that you are incredible and unique. You are meant to be here and fight for what you deserve. You are bright and different, you must not let them win. Pls speak to someone. Reach out. Keep a diary or talk online about anyone pulling you down, don’t take shit! I know this is easier to say than do but you have to, you need to, you will find some one to listen. We need this world to be a kind place for our future generations and for their sake we must make sure that love and kindness lead the way. Pls be nice to people, be kind and sensitive because you have no idea how fragile or what hardship someone is going through.

A post shared by Ayesha Takia Azmi (@ayeshatakia) on

“मी फिल्मी बॅकग्राऊंड असलेल्या कुटुंबातून बॉलिवूडमध्ये आले नव्हते. त्यामुळे अनेकांची माझी खिल्ली उडवली होती. शूटिंगदरम्यान अनेकांनी माझा अपमान देखील केला होता. परंतु असे खालच्या पातळीवरचे अपमान सहन करणं चुकीचं आहे. त्यांना वेळीच रोखा, अन्यथा ते तुम्हाला मानसिक त्रास देतच राहणार. तुमच्यात क्षमता आहे, तुम्ही मेहनत केली म्हणून तुम्हाला काम मिळतेय हे विसरु नका. बॉलिवूडमध्ये बुलिंग होतच राहणार पण त्याचा धैर्याने सामना करा.” अशा आशयाची पोस्ट आयशाने लिहिली आहे. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2020 2:57 pm

Web Title: ayesha takia opens up about being bullied in film industry mppg 94
Next Stories
1 ..जेव्हा सुशांतने आलिया भट्टवर व्यक्त केली होती नाराजी
2 सुशांतच्या आत्महत्येवर इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयातून शोक व्यक्त; उपसंचालक म्हणाले…
3 ‘तू कितीही जेवलीस तरी… ‘; बायकोसाठी अमेय वाघची भन्नाट पोस्ट
Just Now!
X