News Flash

राम मंदिराच्या भूमिपूजनावर अरुण गोविल ट्विट करत म्हणाले…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे

अयोध्येत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा पार पडणार आहे. यासाठी अवघी अयोध्यानगरी सजली आहे. सध्याच्या करोनाच्या पार्श्वभूमीवर या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी देशभरातील नागरिकांनी आहे तिथूनच हा सोहळा साजरा करण्याचे आवाहनही भाजपाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या सामान्य जनतेपासून ते कलाविश्वातील सेलिब्रिटींपर्यंत ही एकच चर्चा रंगली आहे. अशातच ‘रामायण’ या मालिकेत राम हे पात्र साकारणारे अरुण गोविल यांनी केलेल्या ट्विटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

अरुण गोविल यांनी ट्विट करत भारताच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्ण अक्षरांमध्ये लिहिले जाणार आहे असे म्हटले आहे.

राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी अयोध्या नगरी सजली आहे. रस्तोरस्ती स्वागतांचे फलक, सहज कानी पडणारे भजन, रामनामाचा गजर आणि लखलखती विद्युत रोषणाई असे चित्र अयोध्येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. यावर अनेक कालाकार आपल्या प्रतिक्रिया देत आनंद व्यक्त करत आहेत.

मंदिराचे प्रारूप

राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने पहिल्यांदाच राम मंदिराच्या प्रारूपाची छायाचित्रे प्रसिद्ध केली. हे मंदिर तीन मजली असून १६१ फूट उंच असेल. मंदिराच्या मूळ आराखडय़ात बदल करण्यात आला असून आता मंदिराचा आकार व उंची दुपटीने वाढवण्यात आली आहे. अधिकाधिक भक्तांना एकाच वेळी रामाचे दर्शन घेता यावे यादृष्टीने हा बदल करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2020 11:12 am

Web Title: ayodhya ram mandir janmabhoomi bhoomi pujan ramayan arun govil avb 95
टॅग : Ram Mandir
Next Stories
1 एकमेकांवर चिखलफेक करून सत्य समोर येईल का? रेणुका शहाणेंचा सवाल
2 ‘प्रभू रामचंद्रांच्या कृपेमुळे…’; राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याविषयी चेतन भगत यांचं ट्विट
3 ..अन् ‘त्या’ क्षणापासून सुरु झाला रितेश-जेनेलियाच्या प्रेमाचा प्रवास
Just Now!
X