News Flash

…म्हणून आयुषमानने साडी नेसून फोटो काढला अन् ट्विटही केलं

सध्या आयुषमानचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

…म्हणून आयुषमानने साडी नेसून फोटो काढला अन् ट्विटही केलं

सोशल मीडियावर कधी कुठली गोष्ट व्हायरल होईल याचा नेम नसतो. कधी हॉशटॅग ट्रेंड होतात तर कधी एखादा चॅलेंज ट्रेंड होतो. सध्या सोशल मीडियावर ‘#SareeTwitter’ ट्रेंड होत आहे. दरम्यान अनेक जण साडी नेसून त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. नुकताच अभिनेता आयुषमान खुरानाने देखील त्याचा साडीमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

आयुषमानने नुकताच त्याच्या ट्विटर अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये आयुषमानने पांढऱ्या रंगाच्या टिशर्टवर साडी नेसल्याचे पाहायला मिळत आहे. त्याच्या या मजेशीर अंदाजाने अनेकांची मने जिंकली आहेत. आयुषमानने हा फोटो शेअर करत ‘हॅशटॅग साडी ट्विटर’ असे लिहिले आहे. सध्या त्याचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

आयुषमान खुराना बॉलिवूडमधील उत्कृष्ट अभिनेता आहे. त्याचे ‘बधाई हो’,’अंधाधून’,’शुभ मंगल सावधान’ हे चित्रपट काही भलतेच गाजले. ‘बधाई हो’ चित्रपटाने तर १०० कोटींचा पल्ला देखील पार केला. त्याने एका पाठोपाठ एक हिट चित्रपट दिले आहेत. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. सध्या आयुषमान एकता कपूरच्या ‘ड्रीम गर्ल’ चित्रपटामध्ये काम करत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत ‘प्यार का पंचनामा’ फेम अभिनेत्री नुशरत भरुचा मुख्य भूमिकेत आहे. आयुषमानच्या इतर चित्रपटांप्रमाणेच हा देखील प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करण्यात यशस्वी ठरेल का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

या चित्रटानंतर ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ या चित्रपटात देखील आयुषमान काम करणार आहे.  या चित्रपटाच्या चित्रीकरणाला ऑगस्ट महिन्यात सुरूवात करण्यात येणार असून चित्रपट २०२०मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तसेच या चित्रपटात ‘बधाई हो’ या चित्रपटातील गजराज राव आणि नीना गुप्ता आयुषमानसह झळकणार असल्याचे म्हटले जात आहे. चाहत्यांसाठी हा सुखद धक्काच असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 18, 2019 11:38 am

Web Title: ayushman khurana completed saree twitter trend avb 95
Next Stories
1 BLOG : जुने गाणे, नवीन बांधणी…..
2 Remembering Rajesh Khanna: राजेश खन्नांना होते ज्योतिषविद्येचे ज्ञान अन् पाककलेची आवड
3 राहुल महाजनला ‘या’ अभिनेत्रीने लगावली कानशिलात, कारण…
Just Now!
X