07 March 2021

News Flash

“नाव अनेक पण रिलीज डेट एक”- आयुष्मान खुरानाची घोषणा

दोन नव्या चित्रपटांची घोषणा; एका भूमिकेचा लूकही केला शेअर

सौजन्यः आयुष्मान खुराना इन्स्टाग्राम

अभिनेता आयुष्मान खुराना हा नेहमीच वेगळ्या आणि आव्हानात्मक भूमिका तसंच विषयांना घेऊन काम करताना दिसतो. त्याचे चित्रपट प्रेक्षकांसाठी मनोरंजकही असतात आणि विचार करायला लावणारेही असतात. आता तो पुन्हा दोन नवीन चित्रपटांसह प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सोशल मिडियावरून त्यानं ही घोषणा केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ayushmann Khurrana (@ayushmannk)

दिग्दर्शक अनुभव सिन्हासोबत ‘आर्टिकल १५’ हा समीक्षक, प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला चित्रपट केल्यानंतर ही जोडी आता पुन्हा ‘अनेक’ या चित्रपटात दिसणार आहे. नुकतीच या चित्रपटाची रिलीज डेट आयुष्मानने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे.

१७ सप्टेंबर २०२१ ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे फोटो आयुष्मान आपल्या इन्स्टाग्राम पेजवर टाकत असतो. यातली आयुष्मानची भूमिका कशी असेल, त्याच्या सोबत इतर कोणते कलाकार असतील याबद्दल अद्याप काही माहिती मिळालेली नाही. काही दिवसांपूर्वी आयुष्मानने या चित्रपटातला आपला लूकही शेअर केला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ayushmann Khurrana (@ayushmannk)

आयुष्मानच्या चाहत्यांसाठी अजून एक आनंदाची बातमी म्हणजे त्याचा अजून एक चित्रपटही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘चंदीगढ करे आशिकी’ या चित्रपटातही तो दिसणार आहे. हा चित्रपट अभिषेक कपूरने दिग्दर्शित केला असून यात आयुष्मानसोबत अभिनेत्री वाणी कपूर दिसणार आहे. या चित्रपटाचं शूटिंग नुकतंच पूर्ण झालं आहे. याच्या प्रदर्शनाची तारीख सांगताना आयुष्मानने आपला एक शर्टलेस फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ayushmann Khurrana (@ayushmannk)

यावर त्याच्या चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगत आहे. आयुष्मानचा ‘चंदीगढ करे आशिकी’ येत्या ९ जुलैला प्रदर्शित होणार आहे.
तोपर्यंत चाहत्यांची उत्सुकता प्रचंड ताणली जाणार आहे. दोन दोन नवे चित्रपट म्हणजे चाहते खूश एवढं मात्र नक्की!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2021 1:57 pm

Web Title: ayushman khurana starrer 2 new films shared on instagram vsk 98
Next Stories
1 व्हील चेअरवरुन जाण्याची वेळ का आली? कपिल शर्मानेच सांगितलं कारण
2 छोट्या पडद्यावरचा रोमॅण्टिक हिरो; अभिनय ते रिलेशनशिप्स जाणून घ्या करणबद्दल
3 कतरिनाची बहीण लवकरच बॉलिवूडमध्ये; चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित
Just Now!
X