31 October 2020

News Flash

आयुषमान खुरानाने पाकिस्तानला सुनावले

बॉलिवूडमधील इतर कलाकरांनीही सुनावले आहे

आयुष्मान खुराणा

पाकिस्तानी मंत्र्याने बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राला संयुक्त राष्ट्राच्या ‘सदिच्छा दूत’ पदावरुन हटवण्याची मागणी केली होती. पाकिस्तानातील मानवी हक्क खात्याच्या मंत्री शिरीन मझारी यांनी युनिसेफला पत्र लिहून प्रियांका चोप्राला ‘सदिच्छा दूत’ या पदावरुन हटवण्याची विनंती केली होती. बॉलिवूडमधील अभिनेते जावेद अख्तर आणि अभिनेत्री कंगना रणौतने प्रियांका चोप्रा भारताचे प्रतिनिधीत्व योग्य पद्धतीने करत आहे असे वक्तव्य करत तिला पाठिंबा दिला आहे. आता अभिनेता आयुषमान खुरानाने देखील प्रियांकाला पाठिंबा दिला आहे.

आयुषमानला ‘अंधाधून’ चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी त्याने एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीदरम्यान आयुषमानने ‘प्रियांका आपल्या देशाचे प्रतिनिधीत्व खूप चांगल्या प्रकारे करत आहे. ती केवळ भारतासाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी एक आदर्श आहे. एका लष्कर अधिकाऱ्याची मुलगी असण्याच्या नात्याने ती भारताचे प्रतिनिधीत्व खूप चांगल्या प्रकारे करत आहे’ असे आयुषमान म्हणाला आहे.

प्रियांका चोप्राने काश्मीर प्रश्नी भारत सरकारच्या भूमिकेचे तसेच पाकिस्तानला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी देण्याचे जाहीर समर्थन केले होते. तिने युनिसेफची सदिच्छा दूत या नात्याने शांततेचा पुरस्कार केला पाहिजे. पण तिची भूमिका या तत्वांच्या पूर्णपणे विरोधात आहे. त्यामुळे तिला या पदावरुन हटवावे अशी मागणी शिरीन मझारी यांनी आपल्या पत्रातून केली आहे. काही दिवसांपूर्वी काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर आयशा मलिका या पाकिस्तानी महिलेने लॉस एंजल्स येथील कार्यक्रमात प्रियांका चोप्राला ढोंगी म्हटले होते.

बालाकोट एअर स्ट्राइकनंतर प्रियांक चोप्राने टि्वट करुन “जय हिंद” म्हटले होते. आयशा मलिकने त्या टि्वट संदर्भात प्रियांकाला ढोंगी म्हटले होते. त्यावर प्रियांकाने “मी भारतीय असून माझे अनेक मित्र पाकिस्तानी आहेत. मला स्वतःला युद्ध व्हावं असं वाटत नाही. पण मी देशभक्त सुद्धा आहे. माझ्या त्या ट्वीटमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्याची माफी मागते” असे उत्तर दिले होते. “माझ्या मते सर्वांसाठी एक मध्यम मार्ग असतो. तुझ्यासाठीही असेल. पण ज्या पद्धतीने तू माझ्यावर ओरडून बोलत आहेस हे योग्य नाही. आपण इथं प्रेमाच्या भावनेनं एकत्र आलो आहोत” असे प्रियांका तिला म्हणाली होती. २६ फेब्रुवारीच्या प्रियांका चोप्राच्या टि्वटवरुन संयुक्त राष्ट्राची सदिच्छा दूत म्हणून तिच्या भूमिकेवर आयशाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 23, 2019 8:55 am

Web Title: ayushman khurana support priyanka chopra for goodwill ambassador avb 95
Next Stories
1 दिलीप कुमार-सायरा बानो यांच्या आयुष्यात राहिली एका गोष्टीची कायमची उणीव
2 Bard of Blood Trailer : ये आनेवाले तुफान की आहट है|
3 ब्रेकअपनंतर स्वराच्या आयुष्यात फुलतंय नवं प्रेम; या दिग्गज व्यक्तीच्या मुलाला करतेय डेट?
Just Now!
X