News Flash

आयुषमान खुरानाने खरेदी केले नवे घर

त्याने चंदीगडमध्ये कुटुंबीयांसोबत एकत्र राहण्यासाठी घर खरेदी केले आहे.

लॉकडाउनमुळे बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराना आणि त्याचे संपूर्ण कुटुंबीय चंदीगडमध्ये राहत आहेत. आता आयुषमानने तेथे संपूर्ण कुटुंबासोबत एकत्र राहण्यासाठी एक नवे घर खरेदी केल्याचे समोर आले आहे.

नुकताच आयुषमानने या संदर्भात एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने, ‘खुराना कुटुंबीयांना एकत्र वेळ घालवण्यासाठी फॅमिली होम मिळाले आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांनी मिळून हे नवे घर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. आता इथे संपूर्ण कुटुंबीय एकत्र राहू शकतात. आम्ही या नव्या घरात शिफ्ट होण्यासाठी आतुर आहोत’ असे त्याने म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

Whenever I see all of us in one frame, I feel so blessed #Family @indrani.s.dey

A post shared by Aparshakti Khurana (@aparshakti_khurana) on

आयुषमानचे वडील पी. खुराना, आई पूनम, पत्नी ताहिरा, भाऊ अपारशक्ती आणि त्याची पत्नी आकृती यांनी मिळून हे घर घेतले आहे. चंदीगडमध्ये हे घर खरेदी केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खुराना कुटुंबीय गेल्या काही दिवसांपासून मोठ्या घराच्या शोधात होते. आयुषमान आणि अपारशक्तीचे लग्न झाले आहे. तसेच आयुषमानला दोन मुले आहेत. त्यामुळे राहण्यासाठी त्यांनी ही नवीन प्रॉपर्टी खरेदी केली आहे. तसेच त्यांना तेथे राहायला जाण्यासाठी वेळ लागणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2020 1:48 pm

Web Title: ayushmann khurrana and aparshakti khurrana buy a new house together avb 95
Next Stories
1 “रिमिक्समुळे जुनी गाणी आणखी लोकप्रिय होतात”; गायकाची चकित करणारी प्रतिक्रिया
2 #Prabhas20 : प्रभास करणार पूजा हेगडेसोबत रोमान्स
3 हेअर ड्रेसरला झाली करोनाची लागण; ‘या’ मालिकेचं शूटिंग थांबवलं
Just Now!
X