28 February 2021

News Flash

आयुषमानची पूजा आता हाँगकाँगच्या सिनेमागृहात

५ डिसेंबर रोजी हा चित्रपट हँगकँगमध्ये प्रदर्शित होणार आहे

चौकटीबाहेरचे विषय निवडत विभिन्न भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता आयुषमान खुरानाचा ‘ड्रीम गर्ल’ हा चित्रपट १३ सप्टेंबर २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जणू काही जादूच केली होती. चित्रपटाने १३९ कोटी रुपयांचा गल्ला जमावला होता. आता लवकरच आयुषमानचा ‘ड्रीम गर्ल’ हाँगकाँगमध्ये प्रदर्शित होणार आहे.

यापूर्वी बॉलिवूडमधील ‘बर्फी’, ‘दंगल’, ‘सिक्रेट सुपरस्टार’, ‘हिचकी’ हे चित्रपट हाँगकाँगमध्ये प्रदर्शित झाले होते. या चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद देखील मिळाता होता. आत या चित्रपटांपाठोपाठ आयुषमानचा ‘ड्रीम गर्ल’ हाँगकाँगमध्ये प्रदर्शित होणार आहे. येत्या ५ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

‘ड्रीम गर्ल’ या चित्रपटात आयुषमानसह ‘सोनू के टिटू की स्विटी’मधील अभिनेत्री नुसरत भरूचा मुख्य भूमिकेत दिसली होती. या चित्रपटाची निर्मिती एकता कपूर आणि शोभा कपूर यांनी केली असून चित्रपटाचे दिग्दर्शन राज शांडिल्य केले आहे. ‘ड्रीम गर्ल’ या कॉमेडी ड्रामा चित्रपटात मुलीचा आवाज काढण्यात माहिर असणाऱ्या पुरुषाची लोकेश बिष्टची भूमिका साकारली आहे. हा लोकेश कॉल सेंटरमध्ये नोकरी करु लागतो आणि अनेक कस्टमर्सशी पूजा नावाच्या मुलीच्या आवाजात गप्पा मारु लागतो. त्याचा गोड आवाज ऐकून अनेक कस्टमर्स त्याला कॉल करु लागतात. पोलिस ऑफिसरपासून ते गुंडांपर्यंत अनेकांवर लोकेशच्या आवाजाची जादू पाहायला मिळते. सर्वजण लोकेशच्या प्रेमात असतात. त्यानंतर आयुषमानवर ओढावणारी परिस्थीती पाहण्यासारखी आहे.

आणखी वाचा :Video : बंदिस्त पिंजरा तोडून ‘गर्ल्स’ आल्या सर्वांसमोर

आता आयुषमानचा ‘ड्रीम गर्ल’ हाँगकाँगमध्ये प्रदर्शित होणार असल्यामुळे आयुषमान आणि चित्रपटाची संपूर्ण टीम फार उत्सुक असल्याचे पाहायला मिळते. २०१८-१९मध्ये प्रदर्शित झालेल्या आयुषमानच्या सर्वच चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटांच्या यादीमध्ये ‘अंधाधून’, ‘बधाई हो’, ‘आर्टिकल १५’, ‘ड्रिम गर्ल’, ‘बाला’चा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 14, 2019 1:54 pm

Web Title: ayushmann khurrana and nushrat bharuchas dream girl is headed to hong kong for release avb 95
Next Stories
1 Video : ती परत आली आहे; ‘मर्दानी 2’चा ट्रेलर प्रदर्शित
2 प्रियंका-निकनं घेतलं नवं घर; किंमत तुम्ही ऐकली का?
3 …म्हणून बिग बींनी मागितली कोलकातावासीयांची माफी
Just Now!
X