27 September 2020

News Flash

आयुषमान म्हणतो, ‘अब फर्क लाएंगे’

धर्म, जात, पंथ, लिंग, जन्मस्थान यापैकी कोणत्याही आधारे राज्य आपल्या कोणत्याही नागरिकासोबत भेदभाव करू शकत नाही

आर्टिकल १५

‘बधाई हो’, ‘अंधाधून’सारखे सुपरहीट चित्रपट दिणारा अभिनेता आयुषमान खुराना आता एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘आर्टिकल १५’ असून चाहत्यांना चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे. नुकताच या चित्रपटाचे एक पोस्टर आणि टीझर प्रदर्शित झाला आहे.

आयुषमानने ‘आर्टिकल १५’ या चित्रपटाचा टीझर त्याच्या ट्विटर खात्यावर शेअर केला आहे. या चित्रपटाची कथा उत्तर प्रदेशतील सत्य घटनेवर आधारित आहे. या टीझरमध्ये आयुषमान संविधानातील त्या गोष्टींची आठवण करून देताना दिसतो, ज्यांची शिकवण आपल्याला शाळेत दिली जाते. धर्म, जात, पंथ, लिंग, जन्मस्थान यापैकी कोणत्याही आधारे राज्य आपल्या कोणत्याही नागरिकासोबत भेदभाव करू शकत नाही, असे तो संविधानात म्हटले आहे. चित्रपटात आयुषमाने पोलिसाची भूमिका साकारणार असल्याचे दिसत आहे. टीझरच्या शेवटी चित्रपटाच्या ट्रेलरची तारिख प्रदर्शित केली आहे. तसेच ‘फर्क बहुत कर लिया, अब फर्क लाएंगे’ अशी चित्रपटाची टॅगलाईन आहे.

‘आर्टिकल १५’ आयुषमानसोबत ईशा तलवार, सयानी गुप्ता, मोहम्मद जीशान अय्यूब आणि कुमुद मिश्राही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटासोबतच आयुषमानचा ड्रीम गर्ल हा चित्रपटही येत आहे. नुसरत भारूचा या चित्रपटात प्रमुख भूमिकेत असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2019 5:10 pm

Web Title: ayushmann khurrana article 15 movie teaser is out
Next Stories
1 कोण साकारतंय आंबेडकरांच्या बालपणाची भूमिका?
2 Bigg Boss Marathi 2 : दुसऱ्या पर्वाची पहिली नॉमिनेशन प्रकिया
3 करण जोहर-प्रबळ गुरुंगच्या अफेअरच्या चर्चा, जाणून घ्या सत्य
Just Now!
X