News Flash

‘बधाई हो’, आयुषमाननं बॉक्स ऑफिसवर केलं कमाईचं अर्धशतक

'बधाई हो' साध्या-सरळ पण थेट पद्धतीने एका कुटुंबाची गोष्ट सांगतो.

'बधाई हो'

गेल्याच आठवड्यात प्रदर्शित झालेला ‘बधाई हो’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करताना दिसत आहे. अमित रवींद्रनाथ शर्मा दिग्दर्शित या चित्रपटात आयुषमान खुराना, सान्या मल्होत्रा, गजराज राव, नीना गुप्ता यांची प्रमुख भूमिका आहे. याच महिन्यात प्रदर्शित झालेला हा आयुषमानचा दुसरा चित्रपट आहे. विशेष म्हणजे या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद लाभला आहे, ‘बधाई हो’ चित्रपटानं ५०. ७५ कोटींचा टप्पा पार केला आहे. पहिल्या आठवड्यात या चित्रपटानं चांगलीच कमाई केली होती.

‘बधाई हो’ साध्या-सरळ पण थेट पद्धतीने एका कुटुंबाची गोष्ट सांगतो. जीतेंद्र (गजराज राव) आणि प्रियंवदा कौशिकी (नीना गुप्ता) या एकमेकांवर नितांत प्रेम करणाऱ्या आणि त्याच सहजप्रेमाने संसाराचा गाडा हाकणाऱ्या या जोडप्याच्या संसारवेलीवर याच प्रेमामुळे तिसरे फूल उमलण्याची वेळ येते. एरव्ही या गोष्टीचा बाऊ झाला नसता मात्र या जोडप्याचा मोठा मुलगा नकुल (आयुषमान खुराणा) लग्नाच्या वयातला आहे, तर छोटा मुलगाही अडनिडय़ा वयात आहे आणि आता इतक्या उशिरा पुन्हा दिवस राहिलेत म्हटल्यावर ‘वयाचे भान नाही’ इथपासून ते ‘साधे गर्भनिरोधक वापरण्याची अक्कल नाही’पर्यंत अनेक गोष्टींवरून त्यांची खिल्ली उडवली जाते. मुलांसाठीही हा धक्का असतो आणि त्यांच्या आजीसाठीही हा तथाकथित सामाजिक चौकटीचा भंग असतो. साधरण याच कथानकावर या चित्रपटाची कथा आहे.

आतापर्यंत बॉलिवूडमध्ये अशाप्रकारच्या कथेवर चित्रपट यापूर्वी आला नव्हता म्हणूनच बधाई हो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. पहिल्या तीन दिवसांत ३१.४६ कोटींची कमाई करत या चित्रपटानं ‘स्त्री’लाही मागे टाकलं आहे. तर दुसरीकडे आयुषमान आता स्वत:च्याच चित्रपटाचा विक्रम मोडण्याच्या तयारीत आहे. ५ ऑक्टोबरला प्रदर्शित झालेल्या त्याच्या ‘अंधाधून’ चित्रपटानं ५७. ४२ कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आयुषमान स्वत:च्याच चित्रपटाचा विक्रम मोडण्यास यशस्वी होतो का हे पाहण्यासारखं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 23, 2018 5:34 pm

Web Title: ayushmann khurrana badhaai ho box office day 5
Next Stories
1 अभिषेकच्या सर्वांत आवडत्या रोमॅण्टिक चित्रपटात सलमान- ऐश्वर्याची जोडी
2 ‘तुला पाहते रे’ फेम जयदीप या सुप्रसिद्ध अभिनेत्याचा मुलगा
3 #MeToo : बिग बींच्या मौनाबाबत तनुश्री म्हणते..
Just Now!
X