News Flash

लकी अभिनेत्रीचं नाव आयुषमाननं केलं जाहीर

त्याने आजवर मिळवलेल्या यशात 'या' अभिनेत्रीचा सिंहाचा वाटा आहे.

आयुषमान खुराना बॉलिवूडमधील आघाडीच्या कलाकारांपैकी एक म्हणून ओळखला जातो. सध्या त्याचा ‘बाला’ हा चित्रपट तिकीटबारीवर अक्षरश: धुमाकूळ घालत आहे. आतापर्यंत या चित्रपटाने तब्बल ७६ कोटी रुपयांची कमाई केली आहे. याच चित्रपटाच्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत आयुषमानने आपल्या यशाचे खरे गुपीत उघड केले. त्याने आजवर मिळवलेल्या यशात ‘त्या’ अभिनेत्रीचा सिंहाचा वाटा आहे. ‘ही’ अभिनेत्री त्याच्यासाठी खुप लकी आहे, असे त्याने म्हटले.

कोण आहे आयुषमानची लकी अभिनेत्री?

भूमी पेडणेकर आयुषमानची लकी अभिनेत्री आहे, असे त्याने म्हटले. दोघांनी आतापर्यंत ‘दम लगा के हइशा’, ‘शुभ मंगल सावधान’ आणि आता ‘बाला’ या तीन चित्रपटात एकत्र काम केले आहे.

गंमतीशीर बाब म्हणजे हे तीनही चित्रपट त्याच्या आजवरच्या सिनेकारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखले जातात. या चित्रपटांमुळे आज आयुष्यमान बॉलिवूडमधील आघाडिच्या कलाकारांपैकी एक म्हणून ओळखला जातो असे म्हटले जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2019 1:37 pm

Web Title: ayushmann khurrana bhumi pednekar mppg 94
Next Stories
1 …म्हणून युवराज सानियाला म्हणाला ‘हाय हाय मिर्ची’
2 रानू मंडलने केला मेकओव्हर, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
3 “आमची ४० हजार मंदिरे परत द्या”
Just Now!
X