News Flash

“ही घटना पाहतोय हेच आपलं दुर्दैव”; अम्फन चक्रीवादळामुळे आयुषमान झाला दु:खी

अम्फन चक्रीवादळाने ७२ जणांचा बळी घेतला.

पश्चिम बंगालमध्ये आलेल्या महाचक्रीवादळ अम्फनने रौद्र रूप धारण करत ७२ जणांचा बळी घेतला. या दुर्दैवी घटनेवर बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराना याने प्रतिक्रिया दिली आहे. वादळामुळे प्राण गमावलेल्या लोकांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

अवश्य पाहा – ‘महाभारता’मध्ये या WWE सुपरस्टारने साकारलेली ‘भीम’ ही व्यक्तिरेखा

“महाचक्रीवादळामुळे झालेलं नुकसान पाहणं अत्यंत दुर्दैवी आहे. ओडिसा, पश्चिम बंगाल आणि बांग्लादेशमधील लोकांच्या सुरक्षेसाठी मी प्रार्थना करत आहे. वादळामुळे ज्या कुटुंबांनी आपली माणसं गमावली त्यांचा त्रास पाहून खुपच दु:ख होत आहे.” अशा आशयाचे ट्विट आयुषमानने केलं आहे. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – विकासचा छोटा भाऊही आला; ‘आत्मनिर्भर’वरून अभिनेत्याचा मोदींना टोला

अम्फन चक्रीवादळाने पश्चिम बंगाल व ओडिशामध्ये हाहाकार माजवला आहे. या वादळामुळे समुद्र किनारी भागांमध्ये वाऱ्यांसह मुसळधार पाऊस झाला असून मोठं नुकसान झालं आहे. कोलकत्ताच्या अनेक भागामध्ये पाणी भरलं आहे. या वादळाचा फटका कोलकाता विमातळालाही बसला आहे. विमानतळाच्या चारही बाजूने पाणी भरलं आहे. विमानतळामध्ये प्रत्येक ठिकाणी पाणी भरलेलं आहे. विमानतळाची धावपट्टी आणि हँगर पाण्याखाली बुडाले आहेत. विमानतळाचा काही भाग तर पूर्ण पाण्याखाली गेला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2020 2:44 pm

Web Title: ayushmann khurrana cyclone amphan 72 deaths mppg 94
Next Stories
1 मोहनलाल यांनी वाढदिवशी प्रेक्षकांना दिली भेट, ‘दृश्यम २’चा टीझर प्रदर्शित!
2 Video : स्थलांतरित मजुरांचं जगणं मांडणारा ‘कच्चे दिन’ प्रदर्शित
3 कपिल शर्माने ट्विटरद्वारे कायस्थ समाजाची मागितली माफी
Just Now!
X