News Flash

आयुषमानचा हा व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही, कॉपी केली शाहरुखची पोज

पाहा व्हिडीओ..

सध्या सोशल मीडियावर बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुरानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये आयुषमान बॉलिवूडचा ‘बादशाह’ शाहरुख खानची पोज मजेशीर अंदाजात कॉपी करताना दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

तीन नोव्हेंबर रोजी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवसाच्या निमित्ताने जगभरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला गेला. अगदी वृत्तवाहिन्यांपासून ते सोशल मीडियापर्यंत सर्व ठिकाणी शाहरुखचीच चर्चा होती. दरम्यान आयुषामान खुरानाने देखील मजेशीर अंदाजात शाहरुखला शुभेच्छा दिल्या.

 

View this post on Instagram

 

My first reel. Had to be on Shah sir’s bday. #happybirthdaysrk by @officialjuhiarora

A post shared by Ayushmann Khurrana (@ayushmannk) on

व्हिडीओमध्ये आयुषमानने शाहरुखचे लोकप्रिय गाणे ‘तुझे देखा तो ये जाना सनम’ हे मजेशीर अंदाजात कॉपी केले आहे. त्याचा हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल. या गाण्यात शाहरुख खानच्या हातात गिटार असल्याचे आपण पाहिले होते. पण आयुषमानने मच्छर मारण्याचे रॅकेट हातात घेतले असल्याचे दिसत आहे. एकंदरीत आयुषमानचा हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2020 3:05 pm

Web Title: ayushmann khurrana doing copy of shahrukh khan watch video avb 95
Next Stories
1 ‘विराट वडिलांच्या निधनानंतर खेळू शकतो, मग मी का नाही?’; ट्रोलर्सवर अभिनेत्री संतापली
2 नव्या भूमिकेसाठी किंग खान सज्ज; लवकरच सुरु होणार ‘या’ चित्रपटाची शुटींग
3 बिपाशाने करणसोबत शेअर केला रोमॅण्टिक फोटो; म्हणाली…
Just Now!
X