14 December 2019

News Flash

‘बाला’ने चार दिवसांत पार केला ५० कोटींचा टप्पा

आयुषमान हा 'बॉक्स ऑफिसचा किंग' ठरतोय असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.

आयुषमान खुराना

आयुषमान खुरानाची मुख्य भूमिका असलेल्या ‘बाला’ या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरू आहे. अवघ्या चार दिवसांत या चित्रपटाने ५० कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. त्यामुळे आयुषमान हा ‘बॉक्स ऑफिसचा किंग’ ठरतोय असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. ‘अंधाधून’, ‘आर्टिकल १५’, ‘ड्रीम गर्ल’ आणि आता ‘बाला’ असे सलग हिट चित्रपट आयुषमानने दिले आहेत.

‘स्त्री’ या चित्रपटाचे दिग्दर्शक अमर कौशिक यांनी ‘बाला’चं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटाने चार दिवसांत ५२.२१ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. शाळकरी वयापासून केस उडवत हिरोप्रमाणेच टेचात वावरलेल्या मुलाचे ऐन तारुण्यात केसगळतीच्या समस्येला सामोरे जावे लागते, हा ‘बाला’चा कथाविषय आहे.

आणखी वाचा : महेश बाबूच्या मुलीचं लवकरच कलाविश्वात पदार्पण 

बाला नामक तरुणाच्या गोष्टीतून चित्रपटाची मांडणी करत असताना अचानक आलेल्या या न्यूनत्वातून जाणाऱ्या माणसाची कथा-व्यथा मांडून दिग्दर्शक शांत बसलेला नाही. एकूणच आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक छोटय़ा-मोठय़ा घटनांचे टिक टॉक करत करत लाइक्समागे पळणाऱ्या तरुणाईची मानसिकता दिग्दर्शकाने यात अचूक पकडली आहे. त्यामुळेच हा चित्रपट केवळ अचानक टक्कल पडलेल्या तरुणाच्या गोष्टीपुरता मर्यादित राहत नाही. तो अनेक विषयांना स्पर्श करत पुढे जातो. म्हणूनच हा चित्रपट तरुणाईला आकर्षित करतोय.

‘बाला’ची आतापर्यंतची कमाई-
शुक्रवार- १०.१५ कोटी रुपये
शनिवार- १५.७३ कोटी रुपये
रविवार- १८.०७ कोटी रुपये
सोमवार- ८.२६ कोटी रुपये
एकूण- ५२.२१ कोटी रुपये

First Published on November 12, 2019 11:06 am

Web Title: ayushmann khurrana film bala box office collection day 4 ssv 92
Just Now!
X