News Flash

आयुषमान खुराना दबंग पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत

'आर्टिकल १५' मध्ये आयुषमान खुराना प्रमुख भूमिकेत

गेल्यावर्षी ‘अंधाधून’, ‘बधाई हो’ यांसारखे ब्लॉकबस्टर चित्रपट देणारा अभिनेता आयुषमान खुराना आता नव्या भूमिकेत दिसणार आहे. आयुषमान अनुभव सिन्हाच्या आगामी ‘आर्टिकल १५’ चित्रपटात एका पोलिसाची भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातील आयुषमानचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शनं आयुषमानचा ‘आर्टिकल १५’ मधला फोटो ट्विट केला आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण लखनऊमध्ये होणार आहे. आयुषमान पहिल्यांदाच एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे या भूमिकेत पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. या चित्रपटासोबतच आयुषमानचा ड्रीम गर्ल हा चित्रपटही येत आहे. नुसरत भारूचा या चित्रपटात प्रमुख भूमिकेत असणार आहे.

‘आर्टिकल १५’ आयुषमानसोबत ईशा तलवार, सयानी गुप्ता, मोहम्मद जीशान अय्यूब आणि कुमुद मिश्राही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 6, 2019 6:39 pm

Web Title: ayushmann khurrana in anubhav sinhas next film article15
Next Stories
1 बाबांची राजकन्या लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
2 वेब विश्वात अली फजल-किर्ती कुल्हारी सर्वाधिक लोकप्रिय
3 शनायाची उंच भरारी
Just Now!
X