News Flash

‘हा’ आहे बॉलिवूडमधील नवा सुपरस्टार, एका वर्षात केली तब्बल ४७५ कोटी रुपयांची कमाई

आयुषमानला बॉलिवूडमधील नवा सुपरस्टार म्हटले जात आहे.

‘हा’ आहे बॉलिवूडमधील नवा सुपरस्टार, एका वर्षात केली तब्बल ४७५ कोटी रुपयांची कमाई

आयुषमान खुराना सध्या बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. २०१९ हे त्याच्या सिनेकारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट वर्ष ठरले आहे. त्याने या वर्षात सलग तीन सुपरहिट चित्रपटांच्या जोरावर तब्बल ४७५ कोटी रुपयांची कमाई केली. या अचंबित करणाऱ्या कमाईमुळे आयुषमानला बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या कलाकारांच्या पंक्तित स्थान मिळाले आहे.

आयुषमानने २०१९मध्ये ‘आर्टिकल १५’, ‘ड्रिम गर्ल’ आणि ‘बाला’ या तीन चित्रपटांमध्ये काम केले. आश्चर्याची बाब म्हणजे हे तीनही चित्रपट वर्षातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक ठरले आहेत. या तीन चित्रपटांच्या जोरावर आयुषमानने जगभरातून तब्बल ४७५ कोटी रुपयांची कमाई केली. यामुळे आता आयुषमानला बॉलिवूडमधील नवा सुपरस्टार म्हटले जात आहे.

 

View this post on Instagram

 

Best actor in a leading role (critics) for #Andhadhun Thank you @filmfare

A post shared by Ayushmann Khurrana (@ayushmannk) on

या झंझावाती वर्षाबद्दल काय म्हणाला आयुषमान?

“हे वर्ष माझ्यासाठी कमालीचे ठरले. कुठलाही नवा चित्रपट स्विकारताना मी नवनवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न करतो. हे प्रयोग प्रेक्षकांना आवडत आहेत. त्यामुळे ते माझ्या चित्रपटांना भरभरुन प्रतिसाद देत आहेत.” अशा शब्दात आयुषमान खुरानाने प्रेक्षकांचे आभार मानले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 13, 2019 7:59 pm

Web Title: ayushmann khurrana new superstar of bollywood mppg 94
Next Stories
1 अर्जुन कपूर मिळवून देणार गृहिणींना रोजगार
2 सोनाक्षीने सांगितला क्रिकेटमधला ‘दबंग’ खेळाडू
3 अक्षयने पत्नीला दिलं सर्वात महागडं गिफ्ट, पाहा फोटो
Just Now!
X