28 September 2020

News Flash

‘मला वाटायचं अमिताभ बच्चन म्हणजे…’ आयुषमान खुरानाने सांगितला बिग बींसोबत काम करण्याचा अनुभव

या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच बिग बी -आयुषमानने एकत्र काम केलं आहे

गेल्या कित्येक दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलेला ‘गुलाबो सिताबो’ हा चित्रपट आज अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला. अमिताभ बच्चन आणि आयुषमान खुराना यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट अमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाच्या निमित्ताने बिग बी आणि आयुषमान यांनी पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर केली असून या जोडीने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. त्यातच अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याचा नेमका अनुभव कसा होता हे आयुषमान खुरानाने सांगितलं आहे.

“गुलाबो सिताबो’ या चित्रपटाच्या निमित्ताने मला अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. ते उत्तम कलाकार असण्यासोबतच एक चांगले सहकलाकारही आहेत. त्यांच्यात आजही एक लहान मुल दडलं आहे. त्यांच्यासोबत काम करण्यापूर्वी मला सतत असं वाटायचं की ते गंभीर स्वभावाचे आहेत. परंतु तसं अजिबात नाही. त्यांच्यात एक लहान मुलं लपलेलं आहे”, असं आयुषमान म्हणाला.

पुढे तो म्हणतो, “त्यांच्यात कामाचा प्रचंड उत्साह आणि अभिनयाची आवड असल्याचं दिसून येतं. मला सतत असं वाटायचं की त्यांच्यामुळे सेटवर शांत आणि शिस्तबद्ध वातावरण असेल. मात्र तसं अजिबात नव्हतं. त्यांच्यामुळे सेटवर कायम खेळीमेळीचं वातावरण असायचं. ते प्रचंड बोलक्या स्वभावाचे आहेत”.

दरम्यान, ते स्वार्थी स्वभावाचे नसून कायम इतर कलाकारांना मदत करणारे आहेत, असंही आयुषमान म्हणाला. ‘गुलाबो सिताबो’ या चित्रपटात आयुषमान आणि अमिताभ बच्चन हे मुख्य भूमिकेत झळकले आहेत. या चित्रपटात बिग बींनी मिर्झा ही भूमिका साकारली आहे. तर आयुषमान बांके या भूमिकेत पाहायला मिळाला आहे. नुकताच हा चित्रपट  अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2020 1:52 pm

Web Title: ayushmann khurrana on working with amitabh bachchan ssj 93
Next Stories
1 ‘करीना दररोज झोपण्यापूर्वी करते ही गोष्ट…’ सैफचा टीव्ही शोमध्ये खुलासा
2 ‘ऑनस्क्रीन अबराम-आराध्याची जोडी ठरणार हिट’; शाहरुखच्या वक्तव्यावर बिग बींनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया
3 Video : पीपीई किट घालून ‘या’ अभिनेत्रीनं केला विमानप्रवास
Just Now!
X