21 November 2019

News Flash

आयुष्मानला करायचाय ‘या’ अभिनेत्यांसोबत रोमान्स

यात गली बॉय चित्रपटातील एका अभिनेत्याचाही समावेश आहे

आयुष्मान खुराना

‘विकी डोनर’, ‘बधाई हो’, ‘अंधाधून’ अशा दमदार चित्रपटामंध्ये भूमिका साकारणारा अभिनेता आयुष्मान खुराना सध्या लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. उत्तम अभिनयशैली आणि संवादकौशल यामुळे सध्या त्याच्या पदरामध्ये एकाहून एक सरस चित्रपट पडताना दिसत आहे. ‘विकी डोनर’ या चित्रपटामुळे करिअरला कलाटणी मिळालेला आयुष्मान लवकरच ‘शुभमंगल ज्यादा सावधान’ या चित्रपटामध्ये झळकणार आहे. हा चित्रपट समलैंगिक व्यक्तीच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने आयुष्यमानने एका कार्यक्रमामध्ये हजेरी लावली होती. यावेळी आयुष्मानने या चित्रपटाविषयी आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला. त्यासोबतच त्याला कोणत्या दोन अभिनेत्यांसोबत रोमान्स करायला आवडेल हेदेखील त्याने सांगितलं.

‘शुभमंगल ज्यादा सावधान’ हा चित्रपट ‘शुभ मंगल सावधान’ या चित्रपटाचा सीक्वल आहे. हा चित्रपटामध्ये LGBTQ आणि कलम ३७७ या विषयी भाष्य करण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. एका कार्यक्रमामध्ये या चित्रपटाविषयी आयुष्मानला प्रश्न विचारण्यात आले होते. बॉलिवूडमधील कोणत्या कलाकारासोबत रोमान्स करायला आवडेल असा प्रश्न आयुष्मानला विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना त्याने पटकन विकी कौशल आणि ‘गली बॉय’ फेम अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी या दोन अभिनेत्यांची नाव घेतली.

दरम्यान, या चित्रपटाच्या चित्रीकरणाला ऑगस्ट महिन्यात सुरूवात करण्यात येणार असून चित्रपट २०२०मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आयुषमानच्या ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल. राय करणार आहेत. परंतु चित्रपटात आयुषमानसह कोणते कलाकार झळकणार हे अद्याप समोर आलेले नाही. या चित्रपटात एका समलैंगिक युवाची कथा दाखवण्यात आली आहे. तसेच चित्रपटात LGBTQ आणि कलम ३७७ या विषयी सांगण्यात आले आहे.

 

First Published on June 12, 2019 5:12 pm

Web Title: ayushmann khurrana said he wants to romance
Just Now!
X